कुणी बाटली देत का, बाटली....

जनदूत टिम    29-Mar-2020
Total Views |
Drink_1  H x W: 
 
घरात बसून जगावं की रस्त्यावर बाहेर पडून पोलिसांच्या लाठ्या खाऊन मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर वाढणाऱ्या करोनाच्या भीतीनं लाचार होऊन जगावं?
का फेकून द्यावं देहाचं लक्तर मृत्यच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि अंत करावा माझा, तुझा आणि बाटलीचाही. 
मृत्यूच्या कालसर्पाने जीवनाला असा डंख मारावा आणि त्याचा उतारा म्हणून 🥃दारूचा एक घोटही न मिळावा.
अरे धिक्कार आहे अशा लाचार जगण्यावर!
एकदा पार्टीत बसल्यावर🍾 खंब्या वर खंबे रिचवणारे आम्ही आज दारूच्या एकएका घोटाला तरसतोय?
आणि दारुशिवाय जगणाऱ्या या देहाला निद्रेतही पुन्हा स्वप्न पडू लागली तर?
तर....तर....
अरे इथेच तर खरी मेख आहे.
नव्या स्वप्नाच्या अनोख्या दुनियेत करोनाच्या भयाने प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो ते दारू शिवाय मुर्दाड जीवन.
सहन करतो प्रेताच्या निर्जीवतेने घरातल्या सरकारकडून मिळणारे टोमण्यांचे बलात्कार....
सहन करतो अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या जीवाची विटंबना.... आणि अखेर उभे रहातो आपल्याच मारेकऱ्यांसमोर दारूचा मोकळा ग्लास घेऊन, त्याला कधीतरी कणव येईल म्हणून.
हे विधात्या, तु इतका कठोर कसा झालास?
ड्राय डे च्या दिवशीही कुठूनही दारू पैदा करणाऱ्या आम्हा बेवाड्याना तु विसरलास?
एका बाजूला घरात असलेले आमचे आप्त दारुशिवाय जगणाऱ्या आमची खिल्ली उडवतात आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला सक्तीने घरात बसवणारा मोदी सगळ्या जीवनावश्यक गोष्टींचा अविरत पुरवठा करताना दारू ही जीवनावश्यक गोष्ट आहे हे विसरतो.
पण मग दारू शिवाय विस्कटलेल्या ह्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणाकरा....
आम्ही बेवाड्यानी कोणाच्या पायावर डोकं आपटायच?
सांग, कोणाच्या पायावर?
कोणाच्या? कोणाच्या?
अरे, कुणी दारू देतं का दारू?
कुणी दारू देतं का दारू?
एका दारूड्याला कुणी दारू देता का?
एक बेवडा दारुवाचून, चकण्यावाचून, बीडी सिग्रेटवाचून, बायकोच्या मायेवाचून, मोदींच्या राज्यात पोलिसांच्या लाठ्या खात फिरतोय. अशी एक जागा शोधतोय तिथं त्याला एक तरी क्वार्टर मिळेल, अशी जागा धुंडतय.
कुणी दारू देतं का दारू?