भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष मुन्ना साहेब महाडिक यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर आपला संपूर्ण वेळ घालविला कुटुंबासमवेत!

जनदूत टिम    28-Mar-2020
Total Views |
कोल्हापुर : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे, मग घरात बसूनच अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींचे काम सुरू आहे. कोण नातवांसोबत, कोण मुलांसोबत खेळतानाचे तर काही जण वाचन करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. अशातच माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांचाही एक फोटो व्हायरल झाला असून ते चक्क किचनमध्ये पत्नीला मदत करण्याच्या कामात गुंतल्याचे दिसत आहेत.
 
Munna Mhadik_1  
 
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार झालेले महाडिक हे २०१९ साली पराभूत झाले. पण पराभूत झाल्यानंतरही त्यांनी लोकांची नाळ तुटू न देता या ना त्यानिमित्ताने सुरू असलेल्या संपर्क त्यांनी कायम ठेवला आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
 
घरात बसायचे मग करायचे काय असा मोठा प्रश्न सर्वसामान्यांबरोबरच आजी-माजी लोकप्रतिनिधींना सतावत आहे. त्यातून काहींनी मुले, नातवांसह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत कॅरम, बुध्दीबळ, पत्ते यासारखे खेळ खेळण्यात दंग आहेत. काहींनी पत्नीला सहकार्य म्हणून किचनचा ताबा घेतला आहे तर काहींनी पुस्तक वाचणे, गाणी ऐकण्यात आपला वेळ घालवला आहे. अशाच पध्दतीने माजी खासदार महाडिक हेही पत्नीला मदत करण्यासाठी किचनमध्ये नाष्ट्याची तयारी करताना फोटो दिसत आहेत.
 
त्यांच्यासोबत पत्नी सौ. अरूंधती, मुलगा पृथ्वीराज, कृष्णराज हेही काही तरी मदत करताना दिसत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनीच हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला. माजी खासदारांचे एक वेगळे रूप या निमित्ताने पहायला मिळाल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. काहींनी आम्हालाही नाष्ट्याला बोलवा असा आग्रह धरला आहे. त्यातून या फोटाची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
 
अति महाभयंकर कोरोनो व्हायरस ने सर्वत्र धुमाकूळ घातला असल्यामुळे दिनांक २२ मार्च रोजी "जनता कर्फ्यू" होता व त्यानंतरचा सुद्धा सर्व वेळ मी माझ्या सर्व कुटुंबीयांसमवेत माझ्या कोल्हापूर येथील निवासस्थानी घालविला असून यामध्ये मी किचनमध्ये काम करण्याचा अनुभवसुद्धा घेतला आहे.
- धनंजय महाडिक (प्रदेश उपाध्यक्ष भाजपा मा. खासदार कोल्हापूर)