जगातील सर्वात मोठी आध्यात्मिक संघटना ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्य प्रशासिका १०४ वर्षाच्या राजयोगीनी दादी जानकी यांचे माऊंट आबू येथे निधन

जनदूत टिम    28-Mar-2020
Total Views |
आबू रोड (दि. २७ मार्च) स्त्रीशक्तिद्वारा संचलित जगातील सर्वात मोठी संघटना प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका 'स्वच्छ भारत अभियानाच्या ब्राण्ड अॅम्बेसेडर' राजयोगीनी ब्रह्माकुमारी डॉ. जानकीदादी यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले. माऊंट आबू , राजस्थान येथील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये २७ मार्च रोजी सकाळी २ वाजता त्यांनी अतिम श्वास घेतला. त्यांना गेल्या दोन महिन्यापासून श्वास आणि पोटाचा आजार होता, त्यांचेवर यासाठी उपचारही सुरु होते. त्यांचे अतिम संस्कार ब्रह्माकुमारीज मुख्यालय शांतीवन येथील संमेलन सभागृहासमोरील मैदानात आज दुपारी ३.३० वाजता होईल
स्त्री शक्तिच्या प्रेरणास्त्रोत ब्रह्माकुमारी दादी जानकी यांचा जन्म १ जानेवारी १९१६ मध्ये हैद्राबाद सिंध येथे झाला. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांनी ब्रह्माकुमारीज संस्थेचा आध्यात्मिक मार्ग निवडला व त्यात त्या संपूर्णपणे समर्पित झाल्यात.
 
Rajyogini_1  H
 
आध्यात्मिक प्रगतीचे शिखर पादाक्रांत केलेल्या राजयोगीनी दादी जानकी यांचे शिक्षण केवळ इयत्ता चौथीपर्यंत झाले. परंतु आध्यात्मिक प्रगतीच्या आभाने तेजपुंज होऊन त्यांनी जगात भारतीय दर्शन, राजयोग आणि मानवीय मूल्यांच्या स्थापनेसाठी केलेले कार्य अद्वितीय ठरले. भारताप्रमाणे विदेशातही राजयोगाचा प्रसारासाठी त्यांनी सन १९७० मधील पाश्चिमात्य देशांचा दौरा केला. जगातील १४० देशामध्ये मानवीय मूल्यांचे बीजारोपण करुन हजारो सेवाकेंद्रांची स्थापना करुन लाखों लोकांमध्ये एक नवीन जीवन फुलविले. राजयोगीनी दादी जानकी यांनी मन, आत्मा यांच्या आंतररीक स्वच्छतेबरोबर बाह्य स्वच्छतेसाठीही अद्वितीय कार्य केले. ज्यायोगे भारत सरकारने त्यांना स्वच्छ भारत अभियानाचे ब्राँड अॅम्बेसिडर बनविले होते. दादी जानकी यांच्या देहावसानची बातमी ऐकताच देश विदेशातील संस्थेच्या अनेक सदस्यांनी त्यांचेसाठी योगाभ्यास सुरु केला. त्यांचे पार्थीव शरीर माऊंट आबू हुन आबूरोड शांतीवन येथे आणले जाईल. भावपूर्ण श्रद्धांजली नंतर पंचतत्वात विलीन केले जाईल.
आध्यात्मिक क्षेत्रात स्त्रीशक्तिद्वारे संचलित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका राजयोगीनी ब्रह्माकुमारी जानकी दादी यांचे वयाच्या १०४व्या वर्षी २७ मार्च, २०२० रोजी सकाळी २ वाजता संस्थेच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालयी, माऊंट आबू (राजस्थान) येथे देहवासान झाले त्यानिमित्त त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या कार्यावर लिहिलेला विशेष लेख देत आहोत..
- डॉ. सोमनाथ वडनेरे, जळगाव, माध्यम समन्वयक, ब्रह्माकुमारीज्
योगशक्ति राजयोगीनी ब्रह्माकुमारी डॉ. जानकीदादी : एक अलौकिक व्यक्तित्व
राजयोगीनी ब्रह्माकुमारी दादी जानकी स्त्रीशक्तिद्वारा संचलित जगातील सर्वात मोठी संस्था प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका होत्या. विश्व विद्यालयाच्या स्थापनेपासूनच अर्थात् सन १९३७ पासून त्या समर्पित होत्या. जगातील पाचही महाद्विपामध्ये राजयोगाच्या प्रसार आणि प्रचारासाठी परिभ्रमण करुन जगात शांती स्थापनेच्या कार्यात आपले अलौकिक योगदान देणा-या दादीजींना जगातील सर्वात स्थिर मनाच्या महिला म्हणून गौरविण्यात आलेले आहे. दादी जानकीजी यांचा जन्म दि. १ जानेवारी १९१६ मध्ये सिंध प्रातांतील एका धार्मिक परिवारामध्ये झाला. त्या सन १९३६ अर्थात् ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या स्थापनेपासूनच विद्यालयाच्या संपर्कात आल्यात. संस्थेचे साकार संस्थापक प्रजापिता ब्रह्मा आणि निराकार परमपिता शिव परमात्मा यांच्या निर्देशानुसार त्यांनी जीवनात आध्यात्मिकतेचे सर्वाच्च शिखर पादाक्रांत केले. दादी जानकी यांनी अमोघ वाणीने अनेकांना राजयोगाचा सन्मार्ग दाखविला. सन १९७४ मध्ये भारताप्रमाणे विदेशात आध्यात्मिक ज्ञानाची मशाल हाती घेऊन संपूर्ण मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी राजयोगाच्या प्रचार करण्यासाठी त्या ब्रिटनमध्ये गेल्यात. तेव्हापासून आजपर्यंत त्याग, तपस्या आणि अथक सेवेसाठी भारतातून बाहेरील पश्चिमेकडील शेकडो देशात ब्रह्माकुमारी केंद्राचे कुशल संचलन त्या करीत होत्या.
 
भौतिकतेच्या आकर्षमयी देशातील लोकांमध्ये आध्यात्मिक जागृती पसरवून भारतीय संस्कृतीची ओळख दादी जानकी यांनी करुन दिली. करुणा, दयेची प्रतिमूर्ती दादींचे हृदय सर्व प्राणीमात्रांमध्ये प्रेम आणि सद्भावनेने भरलेले होते. राजयोग आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारावर त्यांनी आध्यात्मिकतेद्वारे योगाचे अनेक प्रयोग केलेत. तपस्वीमूते दादोजीनी आपल्या मनाच्या आगाद शक्तिनी वैज्ञानिकांना सुद्धा आचंबित केलेले असून याचाच परिपाक म्हणून त्यांना ऑस्ट्रेलिया येथील युनिवर्सिटी ऑफ मेलबर्न, सन फान्सिस्को येथील युनिर्व्हसीटी ऑफ केलिर्कोनिया, यू.एस.ए. मध्ये टेक्सास यूनिवर्सिटी सारख्या प्रख्यात विद्यापीठांतील वैज्ञानिकांनी परीक्षण करुन आपसात प्रयोगाअंती जगातील स्थीरमनाची महिला म्हणून गौरवान्वित केले. जागृत अवस्थेत विविध गणितीय प्रश्नांचे उत्तर देतांना दादींच्या मस्तिष्कामधून सतत डेल्टा तरंगे प्रवाहित होत होती. सर्वसाधारणपणे मानव गहन निद्रेत असे डेल्टा तरंगे प्रसारित करीत असतो.
 
जगामध्ये योगांचे जितके प्रकार प्रचलित आहेत त्या सर्वांवर वैज्ञानिकांनी परिक्षण केले परंतू त्यांना दादीजींवरील केलेल्या परिक्षणासारखा अदभूत परिणाम पहावयास मिळाला नाही. परिणामतः त्यांना सर्वश्रेष्ठ प्रज्ञायोगी घोषित करुन गौरविण्यात आले. त्यांनी अनेक भव्य आध्यात्मिक परियोजना कार्यान्वित केलेल्या आहेत. ज्यायोगे जगातील अनेकांचे जीवनातील आशेचा अंकुर फुलविला गेला. ब्रह्माकुमारीज् एक अशासकीय आध्यात्मिक शैक्षणिक संस्था आहे. दादींच्या नेतृत्वाखाली १९७७ मध्ये जानकी फाऊंडेशन फॉर ग्लोबल हेल्थ केयरची स्थापना केली गेली. ज्यायोगे लाखो रुग्णांची शारीरिक आणि मानसिक रोगांपासून सुटका झाली. दादी जानकी यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारतासहीत १३० देशामध्ये हजारो सेवाकेद्रे मूल्यनिष्ठ समाजाच्या स्थापनेसाठी आपल्या पायावर सक्षमपणे उभी राहिलीत. संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचे आणि युनिसेफ मध्ये सल्लागार म्हणून विद्यालयास दर्जा बहाल करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय शांती वर्ष म्हणून साजरा करतांना विश्व विद्यालयाच्या या योगदानासाठी दादीजींना विक्रमी सातवेळा शांतीदूत पुरस्कारांनी गौरविण्यात आले. संपूर्ण जगात नऊ लाखाहून अधिक व्यक्ति ब्रह्माकुमारीज् परिवाराशी जोडल्या गेल्यात.
 
आध्यात्मिक प्रगतीचे शिखर पादाक्रांत केलेल्या राजयोगीनी दादी जानकी यांचे शिक्षण केवळ इयत्ता चौथीपर्यंत झाले. परंत आध्यात्मिक प्रगतीच्या आभाने तेजपंज होऊन त्यांनी जगात भारतीय दर्शन, राजयोग आणि मानवीय मूल्यांच्या स्थापनेसाठी केलेले कार्य अद्वितीय ठरले. भारताप्रमाणे विदेशातही राजयोगाचा प्रसारासाठी त्यांनी सन १९७० मधील पाश्चिमात्य देशांचा दौरा केला. जगातील १४० देशामध्ये मानवीय मूल्यांचे बीजारोपण करुन हजारो सेवाकेंद्रांची स्थापना करुन लाखों लोकांमध्ये एक नवीन जीवन फुलविले.
 
जयोगीनी दादी जानकी यांनी मन, आत्मा यांच्या आंतरीक स्वच्छतेबरोबर बाह्य स्वच्छतेसाठीही अद्वितीय कार्य केले. ज्यायोगे भारत सरकारने त्यांना स्वच्छ भारत अभियानाचे बँड अॅम्बेसिडर बनविले होते. अशा आध्यात्मिक प्रतिभेच्या धनी दादी जानकीजी यांनी दि. २७ मार्च, २०२० रोजी ब्रह्माकुमारीज संस्थेच्या मुख्यालयात अंतिम सकाळी २ वाजता श्वास घेतला. त्यांच्या या अद्वितीय आणि अलौकिक कार्यास शतशः नमन.
- डॉ. सोमनाथ वडनेरे, जळगाव
ब्रह्माकुमारीज् माध्यम समन्वयक