जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु राहणार – राजे नार्वेकर

जनदूत टिम    27-Mar-2020
Total Views |
ठाणे : राज्यात २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी, दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी सर्व दुकाने त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील. तसेच घरपोच किंवा सोसायटी परिसरात सेवा उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे,अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या.
 
rajesh_narvekar_1 &n
जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्या तसेच सिलेंडर चा पुरवठा घरपोच सुरळीतपणे सुरु राहावा यासाठी संबधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अन्न धान्यवितरण नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. हि समिती जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी. अथवा वाढीव दराने विक्री या बाबीवर लक्ष ठेवून राहणार आहे. कुठल्याही वस्तूचा तुटवडा हानार नाही याची खबरदारी हि समिती घेणार आहे.
 
खाजगी दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई
काही खाजगी दवाखाने बंद रहात आहेत याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर जिल्हा प्रशासन कारवाई करू शकते याची जाणीव डॉक्टरांनी ठेवावी. त्यामुळे दवाखाने बंद ठेवू नयेत. जर कोणी खाजगी डॉक्टर त्यांचे दवाखाने बंद ठेवत असतील व त्याचे पुरावे प्रशासनाला मिळाले तर प्रशासन त्यांच्यावर कठोर कारवाई करेल असा इशारा श्री नार्वेकर यांनी दिला आहे.
 
फोनवर रिक्षा सेवा
आजारी व्यक्तींना दवाखाण्यात जाण्यासाठी संचारबंदी च्या काळात वाहन सेवा नसल्याने अनेकदा त्यांची गैरसोय होते आहे. हे लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने फोनवर रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व प्रभागांमध्ये रिक्षा संघटनेशी चर्चा करून शहरात विविध ठिकाणाहून २५ अबोली महिला रिक्षाचालक व त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात येणार आहेत. त्यांना फोन करून बोलविता येईल. याचा निश्चितच फायदा होईल असे नार्वेकर
यांनी सांगितले