शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

जनदूत टिम    27-Mar-2020
Total Views |
मुंबई : देशभरातील कृषी क्षेत्रावर कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊन परिणामांमुळे मजूर, शेतीविषयक साधने व इतर संसाधनांच्या अनुपलब्धतेमुळे संपूर्ण कृषी कार्यात अडथळा निर्माण झाला आहे.त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
 
sharad_1  H x W
 
भारतातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनेही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शेतकर्‍यांची परतफेड करण्याची क्षमता पूर्णपणे बिघडली आहे असेही शरद पवार पत्रात म्हणाले आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटकाळात केंद्रसरकारच्या हस्तक्षेपामुळे त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आणि त्वरित दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. दरम्यान या पत्रात परिणामांचा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपायही शरद पवार यांनी सुचविले आहेत.