कोणालाच कसे कळत नाही

मुकेश दामोदरे, सर (वासिंद)    27-Mar-2020
Total Views |


Lock Down_1  H
 
कोणालाच कसे कळत नाही,
हेच मला समजत नाही.
प्रत्येकाला वाटे जणू,
जगाचे आता काही खरे नाही.
का बरे असे वाटते
हेच मला समजत नाही...
कोणालाच कसे कळत नाही
 
२१ दिवसांचे लॉक डाऊन,
सरलेले आयुष्य दाखवित आहे.
जो तो आता पाप-पुण्याचा हिशेब मनाच्या आरशात तपासात आहे.
का बरे असे व्हावे,
हेच मला समजत नाही
कोणालाच कसे कळत नाही
 
टीव्ही,मोबाईल वरील
बातमी भरवत आहे धडकी,
घरातच रहा, बाहेर पडू नका
असे ऐकल्यावर चेहरे बनत आहेत रडकी
का बरे असे झाले,
मला समजत नाही
कोणालाच कसे कळत नाही
 
कोरोना हा संसर्गजन्य रोग,
तो काही यमराज नाही,
शासन नियम,उपाय पाळा
तो काही बाधित नाही,
२१ दिवस घरातच रहा, बघा
आपण आणि आपली पिढी पुढील जीवन पाहात राही.
कोणालाच कसे..
 
अहो,आपणच आहोत खरे रक्षक आपले आणि संपन्न आणि निरोगी समाजाचे,
हेच सगळे सांगतात तरी कसे कळत नाही.
का बरे असे वाटावे,
हेच मला समजत नाही...
कोणालाच कसे कळत नाही