अखेर जग थांबलं!

जनदूत टिम    26-Mar-2020
Total Views |
विज्ञान शाप की वरदान! असा सवाल अनेक वर्षांपासून कित्तेक विज्ञान तत्ववेत्त्याना सतावतो आहे. कित्तेक लेखकांनी अनेक मत मतांतर मांडली. पण आज मात्र ह्या प्रश्नाचं उत्तर अवघ्या जगाला सापडलं आहे. कोरोना विषाणू च्या भीतीने माणसाचा थरकाप झाला आहे. कधी नव्हे तो माणूस आज मात्र स्वतःला वाचवण्यासाठी घरात बंदिस्त आहे. माणसाने विज्ञानाच्या साथीने कित्तेक शोध लावले. निसर्ग माणसाला भरभरून देतो. पण माणूस मात्र कधीच समाधानी झाला नाही. गांधीजी खरं म्हणून गेलेत. ही पृथ्वी अवघ्या जगाला पुरून उरेल तेव्हढी सक्षम आहे पण एका माणसाच्या हव्यासाला मात्र ती कमी पडेल. माणसाला इतका हव्यास आहे की तो विज्ञानाच्या जोरावर प्राकृतिक नियमावलीत हात घालतो.
 
Corona virus 01_1 &n
 
कित्तेक विषाणू स्वार्थासाठी निर्माण करतो. माणसाने स्वतःला संपवण्यासाठी च अणुबॉम्ब बनवले आहेत . विचार करा. जर एक विषाणू अवघ जग बंद करतंय तर कित्तेक देशांनी कितीतरी घातक शस्त्र निर्माण केली आहेत त्यांचा वापर झाला तर आपण सगळेच नष्ट होणार! मग ही प्रगती काय कामाची ? जी माणसाच्याच भवितव्याला हानिकारक आहे. अहो माणूस इतका हावरा आहे की तो चंद्रावर आपलं अस्तित्व बनऊ पाहतोय येवढं कशासाठी ? एवढ्यावरच माणूस थांबला नाही तर काय म्हणतो अशीच दुसरी पृथ्वी आहे म्हणे ब्रम्हांडात . मला तरी वाटते की माणूस विज्ञानाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करतो आहे. कशाला पाहिजे नसला उपद्व्याप? आज एवढी आरोग्य सुविधा मानवाने विकसित केली आहे तरीही माणसाचं आयुष्य कमीच होत चालले आहे .कित्तेक आजार निर्माण होतात आणि याला कारणीभूत ही माणूसच आहे . प्रदूषण ,पर्यावरणाची माणसाने केलेली हानी ,आणि खताचे ,हायब्रीड अन्न धान्य ,माणसाला असक्षम बनवत आहे . तरीही माणूस ह्या गोष्टींवर निर्बंध आणत नाही. या माणसाच्या अतताई पणामुळे कोरोना सारखा भयानक विषाणू निर्माण झाला आहे. आणि आज माणसाला स्वतःला वाचवण्यासाठी घरात बंद करून घ्यावे लागतय .
 
खरंच माणसानं पेक्षा प्राणी बरे वाटतात कधीकधी . ते कधीच निसर्गाच्या विरोधात जात नाहीत. तरीही ते जगतातच ना? उलट माणसाने केलेल्या चुकीची शिक्षा त्या निरप्रधांना भोगावी लागते. पण आज मात्र जग थांबलंय. मिळालेल्या या काही दिवसां मध्ये माणसाने खूप विचार करावा . निसर्गाच्या शक्ती पुढे आपण शून्य आहोत. हा विज्ञान प्रमाणात वापरला तर वरदान अन् प्रमाणापेक्षा जास्त वापरला तर शाप आहे. सकाळी उठल्या पासून झोपे पर्यंत माणूस किती अपेक्षांच्या मागे धावतो . कितीही मिळालं तरी त्याचं समाधान होत नाही. पण आज मात्र जग शांत आहे . भयानक अश्या धक्याने तो स्तब्ध झालाय. त्याला आज कळत नाही की आता काय करावं .तो फक्त स्वतःला वाचवण्याचा मार्ग शोधतोय पुन्हा निसर्गाच्या पुढे जाण्याचा जणू मंत्र पण एक दिवस असा येईल की माणसाने जे काही बनवले आहे तेच माणसाच्या विनाशाला कारण ठरलेलं असेल आणि आज माणूस थांबलाय तो संपलेला असेल . स्वतःच्याच हातानं स्वतःचा विनाश ओढुन