जिल्ह्यातील आपत्तीत ठाण्याचा कलेक्टर आहे कुठे? राजेश नार्वेकर फेल कलेक्टर

किरण निचिते    26-Mar-2020
Total Views |
ठाणे : कोरोनाव्हायरसच्या नावाने २१ दिवसाच्या संचारबंदी च्या निमित्ताने शासनाने घेतलेल्या बंदीनंतर हा कलेक्टर महाशय आहे कुठे ? असा प्रश्न ठाणे जिल्ह्यात विचारला जात आहे.
 
ठाणे जिल्ह्यात शिकून सवरून मोठा झालेला, नावलौकिक मिळवलेला हा कलेक्टर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुर्गम गरीब सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाचा असायला हवा होता. परंतु ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची घोर निराशा यांनी केली आहे. ठाण्याचा कलेक्टर म्हणजे आदिवासी दुर्गम भागाचा मागोवा घेणारा कलेक्टर असायला पाहिजे होता. याना या आदिवासी दुर्गम भागाचे कोणतेही सोयरसुतक नाही इतका बेफिकीर कलेक्टर आम्ही कधी पाहिला नाही.
 
rajesh_narvekar_1 &n 
 
ठाणे जिल्ह्यातील भाजीपाला जिल्ह्यात पोहचावा म्हणून कलेक्टर म्हणून न्याय देण्यासाठी या माणसाने कोणते प्रयत्न केले आणि एकही प्रतिक्रिया दिली नाही. कोणती कार्यवाही सुद्धा या माणसाने केली नाही, हे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अपमानास्पद घटना आहे. शेतकऱ्यांचा जिल्हा कुणबी समाजाचा जिल्हा म्हणून ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्याला या बाबतीत लक्ष घालावे असे वाटली नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. उद्योग नगरी म्हणून ठाणे जिल्ह्याचा नावलौकिक आहे. आशिया खंड म्हणून ठाणे जिल्ह्याचे महाराष्ट्रात नाव आहे. या उद्योगनगरी ला आपण किती गांभीर्यने घेतो यावर लोकप्रतिनिधी नव्हे तर अधिकार यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला जात असतो. यावर कोणतही सौजन्य या माणसाने दाखविलेले नाही या ठिकाणी वागळे इस्टेट - ठाणे, भिवंडी, डोंबिवली औद्योगिक नगरी, अंबरनाथ - बदलापूर तसेच शहापूरमधील आटगाव, आसनगाव याठिकाणच्या लघुउद्योजकांना मदतीच्या अपेक्षेने ठाण्याच्या राजेश नार्वेकर याने कोणती दक्षता घेतली याच एकही उदाहरण आज पाहायला मिळत नाही.
 
ठाणे जिल्ह्यातून भाजीपाला उत्पादक आपला माल घेऊन कल्याण भिवंडी या ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये जात असतात या ठिकाणी शेतकऱ्यांना होणारी अडवणूक पाहता राजेश नार्वेकर यांनी कोणती कार्यवाही केली, कोणती मदत केली, असा प्रश्न ठाणे जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत त्यामुळे या जिल्ह्यात कलेक्टरची गरजच काय? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील बचत गटाची कारकीर्द सबंध महाराष्ट्राने अनुभवली आहे. ठाणे जिल्ह्यातील बचत गटांची सेवावृत्ती संपूर्ण देशाने पाहिली आहे. अशावेळी या बचत गटांना देशात पसरलेल्या आपत्तीच्या प्रसंगी सहभागी न करून घेणारा ठाणे जिल्ह्याचा कलेक्टर राजेश नार्वेकर म्हणजे हा सेवाभाव जपण्यासाठी आलेला नसून पोटभरन्यासाठी आलेला हा कलेक्टर आहे असेच यातून सिद्ध होत आहे.ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आदिवासी लोकांची वरई - नागली खरेदी असो याबाबत बाबतीत कोणताही गांभीर्य नसलेला ठाण्याचा कलेक्टर म्हणजे देशाला कलंक असण्याची जाणीव या भागातील समाज मनात निर्माण झाली आहे.
 
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे नियमितपणे आदिवासी भागातील समस्यांबाबत, त्यांच्या अर्थव्यवस्थेबाबत त्यांच्या दुरवस्थेबाबत सदस्य असतात आणि त्याच महाराष्ट्राचा हा कलेक्टर राजेश नार्वेकर हा बेपर्वाईने वागत असतो याबाबत राज्यपालांनी योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी ठाणे जिल्ह्यातून होत आहे.
 
ठाणे जिल्ह्यातील विकासाच्या नावाने समृद्धी महामार्ग, मुंबई - बडोदा महामार्ग, बुलेट ट्रेन, मेट्रो महामार्ग तसेच ठाणे क्लस्टर योजना या नव नवीन योजनांत चांगलेच भले होत असतांना जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागातील जनजीवनावर दुर्लक्ष झाले आहे.