लोकांनी कामा पुरताच बाहेर निघावे - संतोष परशुराम शिंदे उप जिल्हा संपर्क प्रमुख ठाणे ग्रामीण

जनदूत टिम    26-Mar-2020
Total Views |
शहापूर : आज पोलीस निरीक्षक आढाव साहेब, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आणि नगरपंचायतीचे श्री परदेशी साहेब आणि कर्मचारी वर्ग मिळून सर्व व्यापारी वर्गाला दुकाना समोर एक मीटर अंतर ठेऊन माल विकण्याच्या सूचना देण्यासाठी दुकाना समोर एक मीटर अंतर ठेऊन चौकन करून दिले आणि अश्या पद्धतीने माल विकण्यास सांगितले. तसेच मी आढाव साहेबांशी लोकांच्या भावना काय आहेत त्या बद्दल पण चर्चा केली त्यांनी पण सांगितले की लोकांनी पण बिनकामाचे बाहेर फिरू नये.
 
Santosh Shinde_1 &nb
 
शासनाने आदेशच दिलेत ते पण लोकांच्या हिताचेच आहेत तरी कुठे काही चुका झाल्या असतील तर तश्या सूचना पण आमच्या समोर पोलिसांना दिल्या पण हे पण सांगितले की लोकांनी सुध्धा कायदा पाळावा बिनकामाचे रस्त्यावर फिरू नये काम झाले की घरी निघून जावे. आम्ही पण माणसे आहोत आणि आमची पण मुलेबाळे आहेत तरी आम्ही तुमच्या सेवे साठीच बाहेर आहोत तरी तुम्ही नागरिकांनी सुध्धा सहकार्य करावे. शहापूर नगरपंचायत ने सकाळी ८ ते ११ वाजे पर्यंत शहापुरातील किराणा,दूध,भाजीपाला अश्या अत्यावश्यक दुकानांना वेळ दिलेली आहे तरी लोकांनी त्याच वेळी सामान खरेदी साठी निघावे तसेच मेडिकल स्टोअर्स आणि दवाखाने पूर्ण वेळ चालू राहतील.लोकांनी सुध्धा कामा पुरताच बाहेर निघावे अन्यथा घरीच राहावे. सर्वांनी आपली आणि आपल्या घरच्याची काळजी घ्यावी.