वासींदमध्ये तहसीलदार नीलिमा सूर्यवंशीची बोलती बंद करणारे नागरिक!

जनदूत टिम    26-Mar-2020
Total Views |
शहापूर : तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वासींद शहरात परवा दिवशी तहसीलदार सूर्यवंशी मॅडम यांनी जीन्स पॅन्ट आणि टॉप वर तपासणी मोहीम आपल्या खाजगी गाडीमध्ये येऊन करण्याचा प्रयत्न केला असता येथील मान्यवर नागरिकांनी त्यांना विचारले असता त्यांची बोलती बंद झाली आणि त्यांनी आपला लवाजमा आवरला आणि वासींदमधून बाहेर पडल्या त्या पुन्हा आल्याचं नाहीत. 
 
tahsildar_1  H
 
शहापूर नंतर मुख्य बाजारपेठ म्हणून समजल्या जाणाऱ्या वासिंद शहरात तालुक्याच्या तहसीलदार जेव्हा येतात तेव्हा त्यांनी त्यांचा गणवेशाचा प्रोटोकॉल पाळणे आवश्यक होते. परंतु त्यांच्याकडून ते पाळले गेले नसल्याने त्यांची वासींदमध्ये मोठी चर्चा रंगली होती. जगाला ज्ञान शिकवणाऱ्या अधिकाऱ्याने अगोदर स्वतः शिस्तीने वागणे गरजेचे असल्याचे वरिष्ठ मंडळी सांगत होती.
भर बाजारपेठेत स्वतःची खाजगी गाडी रस्त्यात आडवी लावून कोणत्याही पोलीस फौजफाट्यासह रस्त्यात उभे राहून लोकांची चौकशी करणे म्हणजे शासनाच्या संचारबंदीचे पालन करणे नव्हे तालुक्याच्या वरिष्ठ अधिकार्याने अशाप्रकारे वागणे म्हणजे जनतेने त्यांना मूर्खात काढण्यासरखे आहे.
 
वासींदच्या नागरिकांनी फार सौम्य भूमिका घेतली म्हणून नाहीतर तहसीलदार मॅडम याना फार गंभीर परिस्थितिला समोरे जावे लागले असते, परंतु त्यांच्या वाहनचालकाने गांभीर्याने घेतले आणि नको तो अवचित प्रसंग टळला आणि पटापट घेतलेल्या सर्व मोटारसायकल चालकांच्या गाडीच्या चाव्या ताब्यात देऊन मॅडम ला घेऊन निघून गेला.
याबाबत तहसीलदार मॅडम यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.