देशातील सर्व टोलनाके अनिश्चित काळासाठी बंद - नितिन गडकरी

जनदूत टिम    26-Mar-2020
Total Views |
नवी दिल्ली : टोलनाक्यावर कॅशमध्ये पैसे द्यावे लागत असल्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची जास्त भिती आहे. वेगवेगळ्या भागांतून आलेल्या लोकांच्या हातातून आलेले पैशांचे मोठ्या प्रमाणावर हस्तांतरण होत असल्याने शासनाने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
 
nitin-gadkari_1 &nbs
 
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही मंगळवारी संध्याकाळी देशात २१ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली. आता देशातील सर्व टोलनाक्यावरील टोलवसून तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहेत.
 
दरम्यान, देशात आत्तापर्यंत एकुण ५०० हून अधिक पोझिटिव्ह कोरोनारुग्ण सापडले आहेत. यातील १२२ रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यातील सर्वाधिक रुग्न मुंबई मध्ये सापडले आहेत. देश सध्या कोरोनाच्या दुसर्‍या स्टेजमध्ये आहे. मात्र योग्य ती खबरदारी घेतली नाही तर आपल्याला तिसर्‍या स्टेजमध्ये जाण्यास जास्त वेळ लागणार नाही. तेव्हा सर्वांना आरोग्याची काळजी घेण्याचे आणि घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.