विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस; शेती पिकांचे मोठे नुकसान

जनदूत टिम    25-Mar-2020
Total Views |
अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटांसह बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्याने कांदा, गहू आणि हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संगमनेर,राहरी, श्रीरामपूर, श्रीगोंद्या तालुक्यात सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास आकशात काळे ढग दाटून आले. भंडारदरा परिसरात दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. राहुरी तालुक्यातील लोणी, कोल्हार, बाभळेश्वर परिसरात वादळी वा-यासह पाऊस झाला.
 
Kolhapur_1  H x
 
त्यामुळे या भागातील द्राक्षबाग, डाळिंब,गह हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे या भागातील विजही गायब झाली. कर्जत परिसरातही पावसाने हजेरी लावली. नगर शहरातील सावेडी, नागापूर आणि बोल्हेगाव परिसरात वादळी वा-यासह पाऊस झाला. त्यामुळे या भागातील वीज पुरवठाही बराच वेळ खंडित झाला होता. नेवासा शहर व परिसरात वादळी वा यासह पाऊस पडला.श्रीगोंद्यात आढळगाव, कोकणगाव, भावडी, घोडेगाव, तांदळी दुमाला भागातील गहू व हरभरा पिकाचे नुकसान झाले. अकोले तालुक्यातही काही भागामध्ये जोरदार पाऊस झाला असून, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर तालुक्यातील काही भागात मंगळवारी पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले असून, दुस-या दिवशी बुधवारी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरात अंधारात आहेत.
 
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात सोसाट्याच्या वायांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. आंबा परीसर, आजन्यात गारपीट झाली असून वीजांच्या कडकडाटासह आजरा, उत्तर परिसरात जोरदार पाऊस झाला. सांगरुळ परिसरात बुधवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून रस्त्यावर पडली.
पन्हाळा तालुक्यातील माजगाव परिसरात वादळी वायासह धुव्वाधार पाऊस सुरू आहे.सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचाही मारा होत आहे. पन्हाळा पश्चिम परिसरात पावसाचे वातावरण शेतकन्यांची धांदल सुरू आहे. कोल्हापूर परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची सुरूवात झाली आहे.
 
Pune_1  H x W:
 
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस शहर व ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरला असून शहरातील विविध पेठांसह कोथरूड, हडपसर, कोंढवा, बिबवेवाडी या उपनगर भागातही पावसाने हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट सुरु होता. सध्या देशात कोरोना विषाणूमुळे लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे, त्याचा परिणाम म्हणून जास्त संख्येने नागरिक रस्त्यांवर नाहीत. पुण्यात सिंहगड रस्ता, बुधवार पेठ, हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर, कात्रज, वारजे भागात तर ग्रामीण भागात मुळाशी, भूगाव, बावधन पट्ट्यात पावसाने हजेरी लावली.या पावसामुळे ग्रामीण भागात कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत असून त्यामुळे पिकावर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अवकाळी पावसामुळे ज्वारी आणि गहू पिके झाकण्यासाठी शेतक-यांची धावपळ उडाल्याचे बघायला मिळाले.