गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अशी करा पूजा

जनदूत टिम    25-Mar-2020
Total Views |
gudi012_1  H x  
 
नवे स्वप्न, नवी आशा, नवी आव्हाने आणि नित्यनव्याने घडणारी स्थित्यंतरे यांचा हिंदू कालगणनेनुसार सरते वर्ष फाल्गुन मासाने पूर्णत्वास येते आणि नववर्षाचा शुभारंभ वर्ष चैत्र मासाच्या आगमनाने होतो. मागील वर्ष हेमलंबीनाम संवत्सर शके १९३९ म्हणून ओळखले जात होते तर येणारे वर्ष विलंबीनाम संवत्सर शके १९४० म्हणून ओळखले जाईल. एकत्रित मिलाफ म्हणजेच नवे वर्ष. शुभारंभाचे पडघम वाजवत येणारे हे वर्ष, नवे धाडस आणि साहस करण्याचा उत्साह मनात बाळगणारे, सृजनशील कल्पनांना वाव देणारे तसेच उत्तम संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकतात असा आत्मविश्वास देणारे आहे, ज्याची आपण सर्वजण अगदी मनापासून वाट पाहत आहोत. नवे वर्ष म्हणजे नवे काहीतरी घडणार असण्याची सुखद चाहूल, जी येताच सर्वत्र प्रसन्नता निर्माण होते. साडेतीन मुहूर्तांशी सांगड घालणारा गुढीपाडवा या नवलोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा असतो. या सणाच्या निमित्ताने उभारली जाणारी गुढी पारंपरिक, आनंदाची आणि मनाला प्रसन्नता देणारी आहे. मांगल्याची पखरण करत येणारी ही गुढी उभारण्यासाठी प्रत्येकजण
उत्सुक असतो.