सदैव सक्रिय शिवसैनिक जागा हो नागरिकांच्या मदतीचा धागा हो!

किरण निचिते    25-Mar-2020
Total Views |
ठाणे : ठाणे जिल्ह्यावर असो की राज्यावर नव्हे देशावर येणार्‍या प्रत्येक संकटावर, आपत्तीत सर्वदूर धावून येणारा सजग असणारा शिवसेनेचा शिवसैनिक यावेळी कधी मदतीला धावून येतो अशी वाट पाहत सर्वसामान्य जनता बसली आहे.
 
shivsena_1  H x
 
 ठाणे जिल्ह्याचा सेवाभाव पाहता धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची नागरिकांना सेवा देण्याप्रति असणारी तत्परतेने मदत यावेळेला जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून सुरू आहे. मात्र सर्वदूर शिवसैनिकांकडून अशा प्रकारची मदतीची याचना शहरापासून - खेड्यापर्यंत पर्यंत गावागावात नागरिकांना वाट पाहायला लागत आहे.
 
पोलिसांवर येत असलेला ताण पाहता तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर येत असलेले दडपण पाहतात राजकीय पक्ष म्हणून प्रत्येक आपत्तीत शिवसेना या सर्वांच्या मदतीला धावून नागरिकांना सेवा देण्यात नेहमीच पुढे असेलेली पाहत आलो आहे. त्यामुळे जगभर पसरलेल्या या व्हायरस युद्धामध्ये शिवसैनिकांनी जर पोलीस यंत्रणा आणि महसूल प्रशासन यांच्या मदतीला धावून सहकार्य केल्यास सुसूत्रता येण्यास वेळ लागणार नाही. यापुढे आणखीन एकवीस दिवस नागरिकांना घरात तोंड बांधून बसायचा आहे. अशावेळी बाजारात खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर होणारी गर्दी टाळण्यासाठी शिवसैनिकांनी नव्हे विविध सामाजिक संस्थांनी, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी पोलिस यंत्रणेला सहकार्य केल्यास राज्यातील बाजारपेठांमध्ये होणारा गोंधळ संपुष्टात येईल.
 
सर्व भाजी विक्रेते तसेच कांदा-बटाटे विक्रेते यांना जाहीर सूचना वजा विनंती करीत आहोत की तुम्ही जागतिक संकटाच्या काळात लोकांना खूप जास्त किमतीत विक्री करत आहात असे निदर्शनास आले आहे.यापुढे हे असे चालू राहिले तर आपणावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करण्यास नागरिक पुढाकार घेतील
 
तसेच वेळ पडली तर पोलिस व प्रशासनाच्या मदतीने प्रत्येक एरियात घर पोहोच ही सुविधा ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक ना नफा-ना तोटा या धर्तीवर स्वयंसेवकांच्या आधारे राबवू शकतील असा इशारा ठाणे जिल्ह्यातील वासींद च्या विनोद म्हसकर( शिवसेना, ग्रा. पं. सदस्य) योगेश जोशी (विद्यार्थी सेना विभाग संघटक) या लढवय्या शिवसैनिकांनी दिला आहे.