मुजोर सज्जन जिंदाल चे प्रशासन सरकारला मारते फाट्यावर

अविनाश जाधव    24-Mar-2020
Total Views |
ठाणे : राज्यात नव्हे देशात उफाळलेल्या कोरोना व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी केलेली संचारबंदी पाहता ठाणे जिल्ह्यातील सज्जन जिंदाल च्या कंपनीने शासन आदेशाला फाट्यावर मारून आपला कारखाना चालू ठेवून कामगारांकडून जबरदस्तीने काम करून घेण्याचा प्रकार समोर आला आहे.

jindal get_1  H
 
कामगारांना कोरोना व्हायरस ची बाधा होऊ नये म्हणून सरकार सर्व उद्योग बंद करून संचारबंदी लागू केली असतांना इतक्या मुजोरपणाने हा उद्योजक आपला कारखाना चालू ठेऊन देश विदेशातील हजारो कामगार ऐका ठिकाणी काम करीत आहेत.*
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वासींद येथिल या कारखान्यात अनेक अधिकारी आणि मॅनेजमेंट स्टाफ परप्रांतीय असून मजूर लोक फक्त स्थानिक पातळीवर चे कामगार आहेत. तसेच येथे अनेक अभियंता लोक परदेशातून येत असतात.
स्थानिक कामगारांना घेऊन कारखाना सुरू ठेवल्यामुळे वासींद आणि शहापूर परिसरातील गावकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.
आज jsw कंपनी चालू होती त्या संदर्भात काल दुपारी २.०० वाजता वासिंद ग्रामपंचायत सरपंच सौ.लता शिंगवे , श्री.वासुदेव काठोळे, श्री. सतिश भोंडवे, कु. विनोद म्हसकर व पोलिस प्रशासन API श्री. गुजर साहेब व सहकारी यांनी कंपनीत जाऊन कंपनी प्रशासनास कंपनी सुरू ठेवली आहे त्या संदर्भात विचारणा केली. विचारणा करताना कंपनी मधील वर्कर संख्या, त्यांची सुरक्षितता, कंपनी सुरू असण्याबाबतची कारण जाणून घेतली, तसेच कंपनी प्रशासनाने लवकरात लवकर कंपनी मधील वर्कर संख्या ही अतिशय कमी ठेऊन, नंतर कंपनी पूर्णपणे बंद करू असे आश्वासन दिले. तसेच बाहेर गावातून इतर कोणी वर्कर किंवा माणूस कंपनीत येणार नाही याची पूर्ण खबरदारी घेऊ असे सांगितले.*
वरील चर्चे नंतर कंपनी प्रशासनास असं नाही झालं तर लवकरच सन्मा .जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन कार्यवाहिसंदर्भात सल्ला घेऊ असे सांगण्यात आले.*
याबाबत ग्रामपंचायत वासींद ने जिंदाल प्रशासनाला कारखाना बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र याला प्रतिसाद मिळालेला नाही.