वाड्यातील रस्त्यांची १५ दिवसांत दूरदशा

जनदूत टिम    02-Mar-2020
Total Views |

वाड्यातील रस्त्यांची १५ दिवसांत दूरदशा

जनदूत टिम
वाडा : वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी लहान मोठे रस्ते तयार होत असतात, मात्र भ्रष्ट अधिकारी व बेजबाबदार ठेकेदार यांच्या संगनमताने या रस्त्यांचे नामोनिशाण उभारणीच्या अवघ्या १५ दिवसांत होते. ऐनशेत, कोने व बालीवली या तिन्ही रस्त्यांच्या बाबतीत हेच दिसून येत असून या रस्त्यांच्या कारभाराची स्वतंत्र विभागाकडून चौकशी करण्यात यावी आणि लोकांनी तसेच वृत्तपत्रात याबाबत वृत्त प्रसिद्ध होऊन ही याबाबत किंचितही कार्यवाही न करणाऱ्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता व शाखा अभियंता या तिघांनी चौकशी होऊन त्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांनी केली आहे.
 
vada road_1  H
 
वाडा तालुक्यातील कोने या दीड किमी रस्त्यासाठी २० ते ३० लाख, बालीवली येथे अडीच किमी रस्त्यासाठी ७० लाख तर ऐनशेत या दीड किमी मार्गासाठी २५ लाख खर्च करण्यात आले होते अशी माहिती आहे. असे असतांनाही पावसाळ्यातील अवघ्या १५ दिवसांच्या आत या मार्गावरील काळ्या डांबरीचे रूपांतर लाल चिखलात झाले आणि या मार्गावरून प्रवास करणे जिकरीचे होऊन बसले. विभाग सहाय्यक अभियंता आणि शाखा अभियंता यांच्या प्रतिक्रिया घेत लोकांच्या हक्काचे पैसेज्या ठेकेदारांनी गिळंकृत करण्यासाठी बोगस कामे केली त्यावर कारवाई कधी करणार असा जाब विचारला. तेव्हा अधिकाऱ्यांनी या ठेकेदारांची अनामत रक्कम कापलेली आहे यांकडून कामे पूर्वरत करून घेतली जातील असे सांगण्यात आले. आजही या मागावर बेसुमार खड्डे पडले असून लोकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
 
आश्चर्य म्हणजे कोने येथे आता मुख्यमंत्री सडक योजनेतून नव्याने रस्ता तयार केला जाणार असल्याने ठेकेदाराने बेजबाबदार पणे काम करून लोकांच्या पैशाला चुना लावला तो मार्ग आणि हे प्रकरण नवीन रस्त्याच्या आत दाबले जाणार आहे. वाड्यातील अभियंता डी. एन. मुरुडकर यांना विचारले असता ठेकेदाराने या मार्गावरील खड्डे भरले असून आमच्याकडे त्याबाबत फोटो किंवा तसा काही पुरावा सध्या आहे, असे मला वाटत नाही असे बेजबाबदार आणि मुजोर उत्तर देऊन या प्रकरणाला एकप्रकारे रफदफा करण्याचा प्रयत्न केला आहे. ऐनशेत रस्त्याबाबतही ग्रामस्थांनी लेखी पत्र देऊन काम नीट होत नाही हे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले असून या प्रकरणी आता कार्यकारी अभियंता.
 
उप अभियंता व शाखा अभियंता या तिघांनी चौकशी करून त्यांवर निलंबाची कारवाई करण्यात यावी. शिवाय या त्रिकटांनी मिळन वाडा तालुक्यात अजून किती बोगस कामे केली आहेत याचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी शरद पाटील यांनी बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. जर याबाबत गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.