निर्भया बलात्कारातील दोषींची फाशी निश्चित

जनदूत टिम    02-Mar-2020
Total Views |

निर्भया बलात्कारातील दोषींची फाशी निश्चित

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी जवळपास निश्चित झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज या प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याची क्यूरेटिव याचिका फेटाळली आहे. ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली.
 
nirbhaya rapists_1 &
 
दोषी पवनकडून फाशीच्या शिक्षेला उशीर व्हावा या उद्देशानेच संबंधित याचिका दाखल केल्याचा त्याच्यावर आरोप झाला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून फाशीच्या अंमलबजावणीचा मार्ग जवळपास मोकळा केला आहे. दोषी पवनने शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) सायंकाळी क्यूरेटिव याचिका दाखल केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ याचिका सुनावणीला घेत निकाली काढली. यासाठी न्यायालयाचं नियमित काम सुरु होण्याआधीच ५ मिनिटे चेंबरमध्येच सुनावणी घेण्यात आली.
क्यूरेटिव याचिकेवर न्यायाधीश चेंबरमध्येच सुनावणी घेतात. दोषी पवन गुप्ताच्या या याचिकेवर न्यायमूर्ती एन. व्ही. रमना, अरुण मिश्रा, आर. एफ. नरिमन, आर. भानुमती आणि अशोक भूषण यांनी सुनावणी घेतली. तसेच याचिका फेटाळत दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा केला. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषींना फाशी देण्यासाठी खास मेरठहून पवन नावाच्या जल्लादाला बोलावण्यात आलं आहे. तो फाशीच्या आधीची रंगीत तालीमही करणार असल्याचं सांगितलं
जात आहे.