चलता है. अब नहीचलेगा..!

जनदूत टिम    19-Mar-2020
Total Views |
सत्ता बदलातील पुढाऱ्यांवरही निशाणा; भ्रष्टांना धोका जाणवत नसल्याचा टोला!
दलित वस्ती, बळीराजा चेतना अभियान, भ्रष्टाचारावरून अधिकारी फैलावर!
आ. ठाकूर यांची शासनासह भ्रष्ट अधिकाऱ्यांना चेतावनी
 
 
 
 
 
 
उस्मानाबाद: तुमचा कागदावर अभ्यास जिथं संपतो तिथून पुढे माझा सुरू होतो.. हा जिल्हा माझा आहे.. तुम्ही काहीही कराल... कसंही वागाल.. ९-९.. १०-१० कोटीचे भ्रष्टाचार कराल..! चलता है.. अब नही चलेगा.. ही चेतावनी दिली आहे, भाजपाचे प्रदेश संघटन महामंत्री आ. सुजितसिंह ठाकूर यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना! सत्ता बदलातील 'आघाडी' वरही टीका करताना जिल्हा प्रशासनावर नियंत्रण कोणाचे? असा सवाल करून सेनेच्या म्होरक्यांवरही निशाणा साधला आहे. त्यामुळे आ. ठाकूर यांनी सोडलेला हा राजकीय कोरोना विषाणू किती भ्रष्ट अधिकाऱ्यांना डसणार? याकडे लक्ष वेधले आहे.
 
Sujit SIng Thakur_1 
 
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आ. ठाकूर यांच्या नावाने मंगळवारपासून (दि.१७) एक पोस्ट व्हायरल झाली. राज्यात कोरोनाच्या फैलावाने मुळातच हाहाकार उडालेला असताना उस्मानाबाद जिल्ह्यात आ. ठाकूर यांनी सोडलेल्या या राजकीय कोरोना विषाणूनेही तेवढीच खळबळ माजविली आहे. चलता है.. अब नही चलेगा..! अशा आशयाच्या पोस्टने प्रारंभीलाच अधिकाऱ्यांना गार्भित इशारा दिला. 'तुम्ही ( शासकीय अधिकारी) काहीही निर्णय घ्याल, तुम्हाला अस वाटत असेल की, आम्हाला शासनाने संरक्षण दिलयं.. तुम्ही म्हणाल पुढारी त्यांच्या त्यांच्या कामात अडकले आहेत, आपल्याला कोण बघतोय? आपण आपल्या पोळीवर तुप ओढू . खिसे भरा.. तुम्ही म्हणाल, चलता है, पण हा तुमच भ्रम आहे.
 
तुमचा कागदावर अभ्यास जिथं संपतो तिथून पुढे ज्यांचा अभ्यास सुरू होतो त्या आ. सुजितसिंह ठाकूर यांचा हा जिल्हा आहे. तेव्हा जरा जपून.. तुमचं नेहमीप्रमाणे चलता है.. यापुढे नहीं चलेगा..! भ्रष्ट अधिकाऱ्यांना अशी चेतावनी देताना राज्य सरकारवरही त्यांनी निशाणा साधला 'सरकार बदललंय....बदल हा लोकशाहीचा गाभा आहे पण अनैसर्गिक बदल घडवून झालेले सत्ताबदल प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हिताचे झाले आहे, जनतेच्या प्रश्नावर डोळेझाक आणि आर्थिक लाभाच्या निर्णयात पुढाकार असा काहीसा प्रकार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी चालवलाय. झालेल्या सत्ता बदलात प्रशासनावर कोण लक्ष द्यायचे हेही निश्चित नाही. ज्यांना प्रशासन समजले त्यांची सत्ता नाही आणि ज्यांची सत्ता आहे, त्यांचा अभ्यास कमी दिखाऊ आक्रमकता जादा आहे.
 
यात इमानदार अधिकारी हैराण आणि चलाख अधिकारी मजा मारत असल्याची जहरी टीका त्यांनी केली आहे. शेतकरी आत्महत्याकारण खचला आहे आणि तुम्ही कृषी विभागात ६-७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, मागासवर्गीय बांधव त्यांच्या जीवनात आजही विकासाची वाट पाहतोय आणि तुमच्यातील काही अपप्रवृत्ती त्या विकास निधीत ९-१० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून धिंगाणा घालत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून अधिकाऱ्यांनी जनहितार्थ काम करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, आ. ठाकूर यांच्या या टीकेच्या पोस्टचा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काही परिणाम होणार का? याकडे लक्ष राहणार आहे.