करोना से डरो ना

अभिषेक रंगनाथ काठोळे, वासिंद    19-Mar-2020
Total Views |
Abhishek_1  H x 
 
करोना विषाणू काय आहे, कसा आहे, कुठून आला,.. हे सगळं आपण सतत वाचतोय, ऐकतोय.. त्यावर विचार करण्या पेक्षा करोना विषाणू पासून कसे सुरक्षित राहता येईल, करोना विषाणू चा कसा विनाश करता येईल,.. यावर विचार व कार्य करणे महत्त्वाचे.. सर्वात पहिला व महत्त्वाचा मुद्दा:- DONT PANIC,.. घाबरून जाऊ नका,.. स्वतःचा गोंधळ करू नाका.. करोना एवढा ही भयंकर विषाणू नाहीये जेवढा आपण त्याला घाबरतोय.. हो, आहे धोका, पण योग्य दक्षता व योग्य उपाय योजना अंगीकारल्या तर करोना समस्येवर मात करणे सहज शक्य आहे..
  
आपली काळजी घेणे, अपल्यांची काळजी घेणे, आपल्या देशाची काळजी घेणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.. करोना विषाणू पासून कसे सुरक्षित राहता येईल, करोना विषाणू चा कसा विनाश करता येईल हे आधी स्वतः जाणून घ्या, व नंतर इतरांना ही समजावण्याचा प्रयत्न करा.. जानजागृती फार महत्वाची.. इतरांमुळे आपल्याला करोना विषाणू ची बाधा होऊ नये ही काळजी घेणे या सोबतच आपल्यामूळे इतरांना ही बाधा होऊ नये ही काळजी घेणे गरजेचे.. हलगर्जीपणा मूळे आपल्या सोबतच आपल्या देशाची ही फार मोठी हानी होऊ शकते हे विसरू नका.. काळजी घ्या आपली, आपल्या लोकांची, आपल्या देशाची..
 
काय करावे व काय करू नये हे आता सर्वांनाच माहीत आहे.. गर्दी टाळा, अनावश्यक प्रवास टाळा, इतरांशी थेट संपर्क टाळा, वेळोवेळी हात, चेहरा साबणाने स्वछ धुवा, मास्क चा वापर करा, जमल्यास सॅनिटायजर चा वापर करा.. ताप, सर्दी, खोकला, या सारखे लक्षण आढळल्यास डॉकटर चा सल्ला घेण्यास उशीर करू नका..सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर करोना सारखे विषाणू आपणास बाधा करू शकत नाहीत.. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती काशी जास्तीत जास्त वाढवता येईल यावर विशेष लक्ष द्या.. मग त्या साठी पौष्टिक आहार, व्यायाम, पुरेशी झोप, या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करा..आपण सर्व मिळून आपआपल्या परीने जर कर्तव्य पूर्वक काळजी घेतली तर नक्कीच आपल्यावर व आपल्या देशावर आलेले हे संकट आपण दूर करू शकतो..