शहापुरातील पालिया बिल्डरचा करोडोंचा घोटाळा

किरण निचिते    18-Mar-2020
Total Views |

प्लॉट खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक 

शहापूर : शहापूर तालुक्यातील ‘अवर टाउन’ या शेकडो एकर च्या बंगलो प्रकल्पातील मालक त्याठिकाणी खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करून करोडो रुपयांची उलाढाल बेकायदेशीर करित आहे. अनिल वर्मा यांची फसवणूक केल्यामुळे बिल्डर पालिया यांनी तब्बल ५४ लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी वर्मा यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. तसेच सतत चुकीची माहिती देऊन आम्हा सर्व ग्राहकांची दिशाभूल करून संपूर्ण व्यवहाराचे पैसे घेतल्यानंतरही प्लॉट तसेच इतर सुविधा न देता आमच्या पैशाचा अपहार करून आमची फसवणूक केली आहे. म्हणून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे. कारवाईसाठी अनिल वर्मा यांनी वकिलांमार्फत वारंवार नोटिसा पाठवून पालिया यांना पैशाची मागणी करून तसेच प्लॉट मिळविण्यासाठी वारंवार अर्ज विनंत्या केल्याचे पंचवीस वर्षातील अनेक उदाहरणे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
१९९६ साली वृत्तपत्रांमध्ये मोठ्या मोठ्या जाहिराती करून पालिया नावाच्या व्यक्तीने अवर टाऊन खर्डी येथे बंगलो प्लॉट विक्रीचे काम सुरु केले होते. त्याच माध्यमातून त्यांनी मुंबईमध्ये हे बंगलो प्लॉट विक्रीसाठी प्रदर्शनाचे आयोजन केले होते १९९६ मध्ये ॲडव्हान्स बुकिंग करून मुंबईतील अधिकारी वर्गाने या ठिकाणी आपले प्लॉट बुक केले होते.

Palia Builder 02_1 &
 
त्यावेळी सदर खरेदीदाराला या बिल्डरने कोपऱ्यात जमीन असलेले प्लॉट जर खरेदी करणार असाल तर त्याची १० ते २० टक्के जास्त रक्कम भरावी लागणार असे सांगितले होते. त्यानंतर पालिया बिल्डरने अनिल वर्मा नावाच्या व्यक्तीला एक अशाच प्रकारचा प्लॉट विक्री केला होता. सदर प्लॉट नंबर १५६, सेक्टर - ओ मधील आहे. या प्लॉटचे क्षेत्रफळ 3216 चौ फूट दाखविण्यात आले होते. त्यानुसार अनिल वर्मा यांनी फेब्रुवारी १९९७ ते जानेवारी १९९८ पर्यंत १२ हप्त्याने एकूण १ लाख ६४ हजार ८८० रुपये भरले त्याप्रमाणे पालिया यांनी ठरलेले सर्व पैसे दिल्यानंतरही ही सदर जागेचे एन सर्टिफिकेट व प्लॉटचा ताबा दिला नाही.
सदर प्लॉटचा ताबा घेण्याच्या निमित्ताने पालीया बिल्डरने जानेवारी ९८ पासून फेब्रुवारी २००० पर्यंत श्री अनिल वर्मा यांना वारंवार ऑफिसला बोलावून प्रत्येक वेळी खोटे बोलून आवश्यक असणारी सर्टिफिकेट व प्लॉटचा ताबा देतो असे सांगूनही वारंवार सतत खोटे बोलून अखेरपर्यंत प्लॉट ताब्यात दिला नाही, असे अनिल वर्मा यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे. त्या खोटेपणाला कंटाळून अनिल वर्मा यांनी पालिया बिल्डरला कायदेशीर नोटीस पाठवली आणि माझे झालेले नुकसान आणि भरलेले पैसे असे सर्व व्याजासह मिळून ५४ लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यावेळी पालिया बिल्डरने २००२ साली एन ए प्लॉट व सर्टिफिकेट न दिल्यामुळे त्याबदल्यात त्यांनी एल सेक्टरमधील प्लॉट नंबर ६ त्याचे क्षेत्र ३२८३ स्वेअर फूट हा दुसऱ्या कोपऱ्यातील प्लॉट त्यांनी बाजूला ओपन प्लॉट असून भविष्यात तो प्लॉट असाच राहील. त्यामुळे भविष्यात ओपन राहणार असल्याने त्या बदल्यात तुम्हाला दहा टक्के रक्कम जास्त भरावी लागेल त्याप्रमाणे मी बिल्डर पालिया यांना १० टक्के रक्कम जास्त अदा केलेली आहे. सदर प्लॉटचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पालिया यांनी सदर प्लॉट ला कोणत्याही प्रकारचे कंपाऊंड दिलेले नाही.
 
Palia Builder_1 &nbs
 
आवर टाउन च्या “पालीया” नावाच्या बिल्डरांनी सदर प्लॉटिंग स्कीम लॉन्च करून याठिकाणी कवडीमोल भावाने जागा खरेदी केली होती, त्याच जागेचं प्लॉटिंग नंतर चे रेट पाहता करोडो रुपयांच्या जागा विक्रीच्या व्यवहारातून पाया जमविलेल्या या बिल्डरने सदर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करून मोठ्या आमिषांना बळी पडून त्यांना याठिकाणी इन्वेस्टमेंट करण्यास भाग पाडले होते. खर्डी येथील या बंगलो स्कीम मधील प्लॉट विकून गब्बर झालेला, तसेच सर्व सरकारी अधिकाऱ्यांना खिशात खेळवणारा हा पालीया नावाचा बिल्डर इतका मग्रूर आणि बदमाश निघाला असेल याचा अर्थ लागणार नाही. या तालुक्यातील काय जिल्ह्यातील सर्व राजकारण यांना तर मी विकत घेतले आहे. अशी भाषा वापरणारा हा श्रीमंत पालिया ग्राहकांची गेल्या सत्तावीस वर्षापासून फसवणूक करून त्यांचा छळ केल्याचे प्रकार या ठिकाणी निदर्शनास येत आहेत. याबाबत पालिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या डायरेक्टर पालिया यांना संपर्क साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सदर जागेची सर्व कागदपत्र आणि व्यवहार पूर्ण झाला असून त्यांच्या जागेचे संरक्षण त्यांनी करायचे होते, ती आमची जबाबदारी नाही असे सांगून हात झटकले आहेत.
 
या ठिकाणच्या प्लॉट धारकांना जाहीर केलेल्या सुविधांची वानवा गेल्या २७ वर्षे जाणवत आहे. यामध्ये इंडोर गेम्स, मंडप, क्लब हाऊस, बॅडमिंटन कोर्ट, कम्युनिकेशन सेंटर, गेस्ट हाउस आदी फॅसिलिटी तसेच सदर जमिनीचे अनुषंगाने यातील अनेक सुविधा देण्याचे सांगून त्या विश्वासानेच सदर प्लॉट आम्ही खरेदी केले होते असे अनिल वर्मा यांनी सांगितले आहे. यातील कोणत्याही सुविधा आजपर्यंत दिल्या नाहीत अशी तक्रार अनिल वर्मा यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.