कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाची सुनावणी ३० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान

जनदूत टिम    18-Mar-2020
Total Views |
 
bhima_1  H x W:
 
मुंबई : ‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाने सुनावणीचे कामकाज पुढे ढकलले आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात होणाऱ्या सुनावण्या आता पुण्याऐवजी मुंबई येथील कार्यालयात दि. ३० मार्च ते ४ एप्रिल, २०२० या कालावधीत होणार आहेत. सुनावणीचे सुधारित वेळापत्रक आयोगाच्या पुणे तसेच मुंबई येथील कार्यालयात लावण्यात येईल. अत्यावश्यक कारणाशिवाय आयोगाच्या कार्यालयास भेट देऊ नये, असे आवाहनही आयोगाच्या सचिवांकडून करण्यात आले आहे.