खरंतर हा जगासाठीच एक ब्रेक गरजेचा होता

रमेश विष्णु पाटील    18-Mar-2020
Total Views |
corona_1  H x W 
 
थांबा जरा 15 -20 दिवस घरी,
काही बिघडत नाही.
कुठे धावतोय आपण?
का धावतोय आपण?
नक्की काय मिळवायचय आपल्याला?
याचा जरा विचार करा.
आई वडिलांना वेळ द्या.
आपल्या मुलांना वेळ द्या.
आप्तेष्ट नातेवाईकांना वेळ द्या.
हीच आपली खरी संपत्ती आहे.
निर्जीव संपत्ती कमावण्याच्या नादात,
आपण आपली सजीव संपत्ती हरवत चाललो आहोत.
आपण काय खातोय?
कसं वागतोय?
कसं राहतोय?
निसर्गाने आपल्याला एवढे दिले,
पण आपण त्याला काय देतोय?
हे सगळंच विचार करण्याची वेळ आली आहे.
आरोग्य म्हणजे नक्की काय?
आपली नक्की स्पर्धा कोणाची?
या नाशवंत देहाची किती ती काळजी?
भूतदया, करुणा काही आहे की नाही?
का स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी इतरांचे अस्तित्व मान्यच करायचे नाही का?
खरंच थांबा जरा थोडा वेळ.
अजूनही वेळ गेली नाही.
जरा विचार करा.
नक्की आपले किती आयुष्य शिल्लक आहे याचा.
आणि त्यात आपल्याला नक्की काय मिळवायचे आहे याचा.
उत्पत्ती, स्थिती आणि लय हा तर सृष्टीचा नियम आहे.
अश्या हजारो वेळा ही युगे बदलली आहेत.
युगे 28 तर तो विठोबाच विटेवरी उभा आहे.
आता तुम्हीही झोपेतून उठा, आणि जागे व्हा.
वेळ द्या,
स्वतः ला..!!
छंदांना..!!
निसर्गाला..!!
आरोग्याला..!!
नात्यांना..!!
समाजाला..!!
प्राणिमात्रांना..!!
आणि हो..
कोरोनालाही...!!
तोही बिचारा त्याची वेळ झाली की निघून जाईल.
कारण कोणालाही वेळ नाही तुमच्यासाठी, तुम्ही तरी किमान तुम्हाला वेळ द्या.
आयुष्य सुंदर आहे, सुंदर जगा..!!
आपलाच