भिवंडीत मास्क घालुन साजरा केला डोहाळ जेवण व ओटी भरणाचा कार्यक्रम

जनदूत टिम    17-Mar-2020
Total Views |
भिवंडी : कोरोना व्हायरसने सध्या जगभर थैमान घातले असून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शासनामार्फत जनजागृती करून या व्हायऱ्यस पासून आपण आपला बचाव कसा करू शकतो या बाबत मार्गदर्शन केले जात आहे. असे असतांनाच भिवंडीतील एका विवाहितेने आपल्या गरोदरपणातील डोहाळे जेवणा निमित्त आयोजित ओटी भरण्याच्या कार्यक्रमात स्वतः सह आलेल्या पाहुणे मंडळी व महिलांनी मास्क घालून हा कार्यक्रम साजरा केला.

BHiwandi Dohal Jevan_1&nb 
 
पूनम मोनिश गायकवाड ( रा. मीठपाडा ) असे विवाहितेचे नाव असून रविवारी त्यांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सध्या करोना व्हायरसच्या भीतीने लोक सुध्दा घरा बाहेर पडण्यास नकार देत असल्याने आपल्या कार्यक्रम येणा-या पाहुण्या महिलांना करोना बाबत भीती राहू नये यासाठी पुनम यांनी स्वतः चेह-यावर मास्क लावून आलेल्या सर्व महिलांना मास्क देऊन करोना बाबत घाबरून न जात आपण काय काळजी घेतली पाहिजे या बाबत माहिती देत आपला डोहाळ जेवण
व ओटी भरण्याचा कार्यक्रम
साजरा केला .