राज्यातील सरकारी कार्यालये सात दिवस बंद, सरकारचा मोठा निर्णय

जनदूत टिम    17-Mar-2020
Total Views |
मुंबई: काही दिवसांपूर्वीच भारतात प्रवेश केलेल्या करोना विषाणूनं देशातील सर्वच राज्यात आपला विळखा घट्ट केला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून आतापर्यंत ३९ बाधित रुग्ण सापडले आहेत. मुंबईसह आसपासच्या परिसरात रुग्णांची संख्या १४ वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारची काळजी घेतली जात आहे.
 
Udhhav_1  H x W
 
राजधानी, डेक्कन, प्रगती, दुरांतो एक्स्प्रेससह एकूण २३ मेल- एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत रद्द... करोना संसर्ग टाळणे आणि प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत मध्य रेल्वेचा निर्णय
राज्यातील सरकारी कार्यालयं सात दिवस बंद राहणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
मुंबई शहरातील ९४ पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारीसाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून करोना वायरस संक्रमनाबद्दल केलं जातंय मार्गदर्शन
मुंबईतील घाटकोपरमध्ये करोनाचा आणखी एक संशयित रुग्ण... अमेरिकेहून आलेला हा संशयित कस्तुरबा रुग्णालयात दाखल
कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या पुढील सुनावण्या पुण्याऐवजी मुंबईत होणार, आयोगाची पत्रकाद्वारे माहिती
कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगापुढं होणारी सुनावणी लांबणीवर; मार्चच्या अखेरच्या आठवड्यात होणार होती सुनावणी
अहमदनगर: नेवासा तालुक्यातील घोडेगावात शुक्रवारी भरणारा जनावरांचा बाजार राहणार बंद; कांदा लिलाव मात्र नेहमीप्रमाणे होणार; बाजार समितीची माहिती
पुण्यातील सर्व हॉटेल, बार आणि लॉज उद्यापासून तीन दिवस बंद राहणार
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची घोषणा
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी सदस्य, अधिकारी यांची आरोग्य तपासणी करून सभागृहात प्रवेश
युरोप दौऱ्याहून परतल्यामुळं प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा आयसोलेशनमध्ये; खबरदारी म्हणून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती
अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यातील दैनंदिन व्यवहार बंद
मढी येथील कानिफनाथांच्या समाधी स्पर्श दर्शनास स्थगिती; कावड यात्रा, फुलबाग यात्रा रद्द, अन्नछत्रही बंद रहाणार