भिवंडीतील चावींद्रा डंपिंग ग्राऊंडला आग ; धुराने नागरिक हैराण

जनदूत टिम    17-Mar-2020
Total Views |
भिवंडी : भिवंडी शहरातील मनपाच्या चाविंद्रा डम्पिंग ग्राउंडला सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. हि आग इतकी भयानक होती की दूर पर्यंत या आगीचे लोळ उसळले होते. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
 
Bhwandi Fire_1  
 
एक दोन तासांच्या अथक प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. मात्र आग विझली तरी डम्पिंगला लागलेल्या या आगीचा धूर मोठया प्रमाणात परिसरात पसरल्याने नागरिकांना या धुरामुळे मोठ्या प्रमाणात त्रास झाला. या डंपिंगग्राऊंडच्या आजूबाजूला असलेल्या गायत्री नगर, रामनगर, शांतिनगर परिसरातील नागरिकांना धुराचा व डम्पिंगच्या वासाचा प्रचंड त्रास झाला. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अजूनही मिळाली नाही, किंबहुना हि आग लागली की लावण्यात आली याबाबत तपास सुरु आहे. दरम्यान चावींद्रा डंपिंगग्राऊंडला नेहमीच आग लागण्याच्या घटना घडत असल्याने नेहमीच्या आगिंमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.