भिवंडीतील सोनाळे ग्राम पंचायतीने केली कोरोना विषयीची जनजागृती

जनदूत टिम    15-Mar-2020
Total Views |
भिवंडी : जगभर कोरोनाने थैमान घातला असून या आजाराबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. राज्यात देखील कोरोनाचे रुग्ण पोसिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. विसजेह म्हणजे भिवंडीतील एका 60 वर्षीय वृद्ध महिलेस कोरोनाबाबत संशय वाटल्याने मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र सदर महिलेचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला असून भिवंडीत कोरोनाचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
Bhiwandi 01_1  
 
मात्र नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भिवंडीतील सोनाळे ग्राम पंचायतीचे सरपंच विशू भाऊ म्हात्रे यांनी गुरुवारी ग्रामीण भागातील नागरिकांसह आपल्या गावातील नागरिकांना कोरोना बाबत गैरसमज होऊ नयेत म्हणून ग्राम पंचायतीच्या वतीने गावात कोरोना बाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना कोरोना बाबत घाबरून जाऊ नये असे आवाहन सरपंच विशू भाऊ म्हात्रे यांनी नागरिकांना केले असून कोरोना विषयाच्या माहितीसाठी ग्राम पंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन देखील गुरुवारी करण्यात आले होते.
 
या सभेत अंगणवाडी सेविकेंसह प्राथमिक शाळेचे शिक्षक , शिक्षिका , तसेच ग्राम पंचायत सदस्य सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्याच बरोबर जिल्हा परिषद शाळा सोनाळेच्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी माहिती देऊन हात कसे स्वच्छ धुवावे , स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी , सर्दी खोकला झाल्यास काय उपाय योजना करावी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांना कोरोना बाबत घाबरून जाऊ नये यासाठी गावातून शाळेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.