रेल्वे अधिकाऱ्यांनो बस झाले आता प्रवाशांचेच ऐका

जनदूत टिम    14-Mar-2020
Total Views |

लोकल वाढत नाहीत तोपर्यंत मेल एक्सप्रेस वासिंद - आसनगावला थांबा द्या

किरण निचिते
मुंबईहून - कसारा - आसनगाव साठी जोपर्यंत लोकल वाढणार नाहीत तोपर्यंत मेल एक्सप्रेस ला वासिंद - आसनगाव ला थांबा द्यावा. गेले अनेक वर्षापासून कल्याण-कसारा मार्गावर तिसर्‍या आणि चौथ्या मार्गीकेचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकलसेवा लोकल वाढणार नाही असे रेल्वे अधिकारी मग्रुरीने सांगत आहेत.
 
Train_1  H x W:
 
त्यामुळे जोपर्यंत सदर मार्गिकेचे काम पूर्ण होत नाही. तोपर्यंत कल्याण ते कसारा मार्गावरील वासिंद - आसनगाव येथे मेल एक्सप्रेस ला थांबा द्यावा अशी मागणी प्रवाशांच्या वतीने किरण निचिते यांनी केली आहे.जेणेकरून वेळेत कामगारवर्गाला पोहोचणे शक्य होणार आहे. शाळा कॉलेज चे विद्यार्थी आणि शिक्षक वर्गा ला तसेच महाराष्ट्र सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्यामुळे अनेक कर्मचारी - अधिकारी वर्गाला लवकर ची गाडी पकडून ऑफिस गाठायचे असते, त्याचप्रमाणे उशिराची गाडी पकडून संध्याकाळी घरी यायचं असते. त्यामुळे प्रवाशांची गाडी ची वेळ साधली जात नाही, म्हणून एक्सप्रेसला थांबा मिळावा अशी गेल्याने दिवसाची मागणी या ठिकाणचे रेल्वे प्रवासी करीत आहेत.
 
मुंबई कडे जातांना पहाटेच्या वेळी जाणाऱ्या गाड्या यामध्ये १) नंदीग्राम एक्सप्रेस, २) अमरावती एक्सप्रेस, ३) विदर्भ एक्सप्रेस, ४) देवगिरी एक्सप्रेस, ५) राज्यराणी एक्सप्रेस, ६) पंचवटी एक्सप्रेस, ७) सेवाग्राम एक्सप्रेस यांना थांबा देण्यात यावा.
तर मुंबई हुन नाशिक कडे जाणाऱ्या १) सेवाग्राम एक्सप्रेस, २) नंदीग्राम एक्सप्रेस, ३) पंचवटी एक्सप्रेस, ४) राज्य राणी एक्सप्रेस, ५) विदर्भ एक्सप्रेस, ६) पंजाब मेल, ७) अमरावती एक्सप्रेस, ८) देवगिरी एक्सप्रेस, ९) साईनगर एक्सप्रेस या गाड्यांना ३० सेकंदाचा थांबा देण्यांत यावा अशी मागणी करीत आहोत.