सरकारी अधिकाऱ्यांकडून रगडून काम करून घ्या - विवेक भाऊंचे आवाहन

जनदूत टिम    13-Mar-2020
Total Views |
शहापूर :  झोन दौऱ्याच्या झंझावाताची सुरुवात आज शहापूरमधून झाली. शहापूर तालुक्यातील पिवळी, आघाई, झोन चा मेळावा नेवरे गावात, तर वाशिंद, झोश्रमजीवी संघटनेच्यान , आंबरजे झोन चा बामनपाडा आणि खुंटघर, आसनगाव, लेनाड , धसई, शहापूर शहर यांचा मेळावा मानीचापाडा येथे पार पडला. यामध्ये नियोजनप्रमाणे संघटनेची गाणी व घोषणांनी मेळाव्याची सुरवात झाली. यावेळी मेळाव्याच्या प्रत्येक ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात, आणि श्रमजीवी संघटनेच्या जयघोषात संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ आणि आलेल्या इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

vivek bhau_1  H 
 
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना राज्यातील आदिवासी मूलभूत हक्कांपसून वंचित असून त्याला त्याचे हक्क आणि अधिकार मिळावे यासाठी संघटनेच्या प्रत्येक सदस्याने शेवट प्रयत्न केले तरच खरे स्वातंत्र्य मिळेल आणि या स्वातंत्र्याची भिक नको ते हिसकावून घेण्यासाठी हा दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा असल्याचे संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. प्रत्येकाला राहण्यासाठी घर, घराखलील जागेचा हक्क, पिण्यासाठी पाणी, शिक्षण, वीज, आरोग्य सुविधा, वनपट्टे मिळावे हेच या, रोजगार मिळावा हीच तर स्वातंत्र्य आहे असे भाऊंनी सांगितले.
 
मेळाव्याच्या सुरवातीलाच श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते / पदाधिकारी यांची झोन/ गाव कमिटी नुसार हजेरी घेण्यात आली. मेळाव्यास गाव कमिटी, झोन पदाधिकारी का आले नाहीत ? याचा जाब तालुका पदाधिकारी यांना विचारण्यात आला. असेच नियमित गैरहजर राहणाऱ्या कार्यकर्ते / पदाधिकारी यांची यादी तयार करावी आणि जे 3 मीटिंगला गैरहजर राहतील त्याच्यावर कारवाई करून, त्यांच्याजागी नव्या सदस्याला संधी देण्यात येईल अशी सूचना भाऊंनी केली. यावेळी गाव कमिटी रजिस्टरची तपासणी केली असता त्यामध्ये बरीच रजिस्टर अपूर्ण असल्याचे लक्षात आले ती पुढच्या वेळेस जिल्हा अध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस आढावा साठी येतील तेव्हा पूर्ण करावीत अशा सूचना देण्यात आल्या. गावांच्या प्रश्नांच्या मांडणी मध्ये कमिटीने सोडवलेले प्रश्न , प्रलंबित प्रश्न मांडले. यावेळी संघटनेच्या सदस्यांनी स्वतः पुढाकार घेऊन गावांचे प्रश्न सोडवल्याबद्दल भाऊंनी त्यांचे भाऊंनी अभिनंदन केले. तसेच इतर प्रलंबित प्रश्न स्वतः गाव कमिटीने सोडवावेत असे आवाहन भाऊंनी केले. मेळाव्याला मार्गदर्शन करताना भाऊंनी जुन्या कार्यकर्ते यांनी केलेली मेहनत व त्यांनी प्रश्न कसे सोडवले हे सांगितले. आजपासून सुरु झालेला दौरा हा केवळ दौरा नसून संघटनेला नवी दिशा देणारी दौड आहे.
 
गावागावात जाऊन लोकांचे प्रश्न समजून ते सोडवणे, नागरिकांना सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे प्रत्येक वाडीतील प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळायलाच पाहिजेत असे भाऊंनी सांगितले. आपले प्रश्न सुटल्याशिवय गप्प बसू नका. सरकारी अधिकाऱ्यांकडून रगडून काम करून घ्या, कारण आपण मालक आहोत हे लक्षात असूद्या असे आवाहन संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांनी उपस्थितांना केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्ष केशव नानकर राज्य उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, उपकार्याध्यक्ष स्नेहा ताई पंडित, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे,राज्य कातकरी प्रमुख गणपत हिलम तर उपप्रमुख लक्ष्मण सवर ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, दशरथ भालके यांच्या सह झोन प्रमुख, गाव कामेटी सदस्यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहापूर तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी केले.