कोरोना व्हायरस विषयीक जनजागृती वॉल्क

जनदूत टिम    12-Mar-2020
Total Views |
वासिंद : सर्वत्र कोरोना वायर्स याने धुमाकूळ घातला असताना याविषयी समजगैरसमज दूर व्हावेत आणि जनजागृती व्हावी या हेतूने मंथन युवा प्रतिष्ठान या संस्थेने वासिंद वॉल्क ए थॉन या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. मंथन युवा प्रतिष्ठान, वासिंद. रजि. संलग्न नेहरू युवा केंद्र ठाणे, भारत सरकार आणि विनायक मार्शल आर्ट अँड फिटनेस झोन यांच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात सहकार्य हेतू आरोग्य दूत म्हणून उत्तम असे योगदान देते आहे तसेच विद्यार्थीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने सांस्कृतिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, वैज्ञानिक सहल, व्याख्याने , प्रबोधनपर मार्गदर्शन, असे अनेकविध कार्यक्रम राबविले जात आहेत .
 
corona_1  H x W
 
या संस्थेच्या वतीने 'आरोग्यम धन संपदा' या उक्ती प्रमाणे वासिंद विभागामध्ये वासिंद वॉक- ए - थॉन 2020.. या स्पर्ध्येचे आयोजन केले आहे . या स्पर्ध्येचा मुख्य हेतू संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरस यांचा प्रादुर्भाव होत आहे या विषयी असणारे समज गैरसमज दूर होऊन जनजागृती व्हावी आणि आपल्या गावा बरोबरच आपल्याला देशाचे आरोग्य ही उत्तम राहावे हे आहे. ही स्पर्धा दि. 15 मार्च 2020 रोजी सकाळी 7:00वाजता वासिंद सर्कल येथून करण्याचे योजले आहे. मुख्य म्हणजे ही स्पर्ध्य वय 30 वर्षा पुढील पुरुष आणि स्त्रीया याच्यासाठी घेण्यात येणार आहे. तसेच विभागातील सर्व अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी, शाळा विद्यालय, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी , प्राथमिक आरोग्य केंद्र , पोलीस अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी , रेल्वे कर्मचारी, ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी, महा बँक व्यवस्थापक आणि कर्मचारी, आणि ग्रामस्थ यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गणेश गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण युवा टिम ने केले आहे..