कल्याण पुर्व हा विभाग KDMC मधून का वगळला पाहिजे ?

जनदूत टिम    12-Mar-2020
Total Views |
कल्याण : कल्याण पुर्व सातत्याने दुर्लक्षित ठेवण्यात ,स्थानिक स्वराज्य संस्था, नेते यशस्वी ठरलेत ,कल्याण पुर्वेत नागरी सुविधा नाहित, पालिकेचे चांगले हॉस्पिटल नाही , खेळाचे सुसज्ज मैदान ,गार्डन नाही की ,चांगले क्रिडासंकुल नाही , सुसज्य अभ्यसिका लायब्ररी,नाही नाट्यगृह नाही.स्थानिक स्वराज्य संस्थेची परिवहन व्यवस्था उपयोगाची नाही .रस्ते खड्डे तर नेहमीचाच विषय, कल्याण पुर्वेचा डायरेक्ट संपर्क पश्चिमेचा खडतर आहे .

KDMC_1  H x W:
 
ज्याकरीता कल्याण पुर्वेतीलनागरीककर देत आहेत ,त्या सुविधा नावाला आहेत.जुन्या वस्त्या चाळीतील ड्रेनेज ,मलवाहिनी ची दुरावसस्ता आहे .गाटारी नाल्यातुन जलवाहिनी जात आहेत .पूरसे पिण्यास , व पिण्यायोग्य पाणी नाही .आरोग्याचे प्रश्न सातत्याने येत आहेत .अशा परिस्थितीत भरल्या जाणार्या कर रुपी पैशाचा मोबदला आम्हाला मिळतोय का हा मोठा प्रश्न आहे.
कल्याण पुर्वेतील गोळाकेलेला कररुपी पैसा सर्व कल्याण पश्चिम आणी डोंबिवली विभागाकडे जास्त वापरला जातोय ,वळवला जातोय .त्यामूळे सर्व सुविधा तिकडे देण्याचा प्रयत्न होतोय . कल्याण पुर्वेचे नेते ,लोकप्रतिनिधी आमदार याबाबत लोकांचे प्रतिनिधित्व आज पर्यंत करु शकले नाहित . पालिका ज्या पक्षांच्या हातात .त्याच पक्षाच्या हाती मुंबई व ठाणे आहे .तिथे मात्र 500स्वे .फीट च्या घरांना करामधे सूट दिले जाते ,इथे मात्र सुविधाचा वानवा असुन अशा प्रकारे निर्णय होत नही विरोधी पक्ष नकोत्या मुद्यात गुंतलेले आहेत .
मग आम्ही का यांच्या सोबत पालिकेत राहायचे आम्ही का नाही कल्याण पूर्वेची वेगळी नगरपरिषद मागावी ,ज्यात करदात्या नागरीकान्ना योग्य न्याय मिळेल .म्हणून आम्हाला वगळावे. कल्याण पुर्व वगळा ,27 गावांची नगरपरिषद होणार आहे ? त्याच नगरपरिषदेत कल्याण पुर्व चा समावेश करण्यात यावा .किन्वा स्वातंत्र नगरपरिषद लोकसंख्येच्या आधारावर करण्यात यावी. अशाप्रकारचा अशासकिय ठराव ,तत्कालीन कल्याण पुर्वेच्या नगरसेवाकांनी 2014-15 मधे, केला होता .माझा तसा प्रस्ताव होता
सर्वानुमते मंजुरी झाली होती
आज कोकण विभागीय आयुक्तांनी 27 गावाबाबत स्वातंत्र नगरपरिषद किन्वा कसे ? याबाबत हरकती सुचनांवर 11/03/2020 रोजी व आज सुनावणी केली आहे .कल्याण पूर्वेची मागाणी ही त्यांनी लक्षात घ्यावी .व आम्हाला पालिकेच्या जोखडातुन मुक्त करावे .त्या शिवाय कल्याण पुर्वेचा सुनियोजित विकास शक्य नाही .
- उदय रसाळ , कल्याण विकासिनी