करोना : ऑलिम्पिकही रद्द होण्याची शक्‍यता

जनदूत टिम    12-Mar-2020
Total Views |
टोकियो - करोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही तर स्पर्धा रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय सध्यातरी दिसत नाही. यंदा जपानमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील हजारो खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ येथे दाखल होणार असून करोनामुळे त्यांच्यासह देशवासियांसाठीही करोना अत्यंत धोकादायक ठरू शकतो. सध्यातरी यावर कोणतीही प्रतिबंधात्मक औषधे नाहीत त्यामुळे सगळ्यांचा जीव धोक्‍यात घालणे शक्‍य नाही. केवळ स्पर्धा आयोजन आमच्यासाठी महत्वाचे नसून प्रत्येकाचे आयुष्य आमच्यासाठी जास्त महत्वाचे असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
 
corona-olympics_1 &n
 
ही स्पर्धा येत्या जुलैमध्ये होणार आहे, त्यासाठी जवळपास चार महिन्यांचा कालावधी आहे मात्र तरीही कोणताही धोका पत्करण्याची इच्छा नाही. खेळाडूंचेच नव्हे तर प्रत्येकाचे आरोग्य महत्वाचे असल्याने जो पर्यंत या विषाणूंवर नियंत्रण मिळविले जात नाही तो पर्यंत तरी या स्पर्धेची अनिश्‍चितता कायम राहणार आहे. ऑलिम्पिकला अद्याप वेळ असला तरी ही स्पर्धा इतक्‍याच कालावधीत अन्यत्र हलविणे देखील शक्‍य नाही, त्यामुळे सध्यातरी ही स्पर्धा रद्द करावी लागणार असल्याचेही संघटनेने व्यक्त केले आहे. टोकियो ऑलिम्पिक येत्या 24 जुलैपासून सुरू होत आहे. स्पर्धेपूर्वी होणारे पारंपरिक टॉर्च लाइटिंग होते. आज (12 मार्च) हा कार्यक्रम ग्रीस येथील ऑलिम्पियात होणार असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र, केवळ संघटनेचे पदाधिकारी, सदस्य देशांचे प्रतिनिधी व विशेष मान्यवर यांनाच केवळ या कार्यक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे.