राज्यात पाच दिवसांचा आठवडा सुरू केल्यामुळे शनिवार-रविवार मुंबई-गोवा हायवेवर ट्रॅफिक जाम तर समुद्र किनारे पर्यटकांनी फुल्ल

जनदूत टिम    01-Mar-2020
Total Views |

राज्यात पाच दिवसांचा आठवडा सुरू केल्यामुळे शनिवार-रविवार
मुंबई-गोवा हायवेवर ट्रॅफिक जाम तर समुद्र किनारे पर्यटकांनी फुल्ल

 
जनदूत टिम
बोरघर / माणगांव : महाराष्ट्र राज्यातील नवनिर्वाचित महाविकास आघाडी सरकारने २९ फेब्रुवारी पासून सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या साप्ताहिक कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा केल्यामुळे शनिवार आणि रविवारी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून ट्रॅफिक जाम झालेली पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे आणि हाॅटेल, रिसाॅर्ट व पर्यटन स्थळे पर्यटकांनी फुल्ल झालेले म्हणजे पर्यटकांच्या गर्दीने फुललेले दिसून येत आहेत.
 

Beach_1  H x W: 
महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या नवीन शासन निर्णयानुसार अर्थात फायू डेज वीक तथा पाच दिवसांचा आठवडा या नूतन शासन निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील काही सरकारी खाती वगळता सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्यालयीन साप्ताहिक कामकाज सोमवार ते शुक्रवार अशा पाच दिवसांचा आठवडा निर्धारित केल्यामुळे सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी सोमवार ते शुक्रवार आपापल्या कार्यालयातील दैनंदिन कामकाज परिपूर्ण करून शनिवार रविवारी आपल्या कुटुंबासह वीकेंडला फिरण्यासाठी वा पर्यटनासाठी नियोजन करून निघू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक आठवड्यातील शनिवार आणि रविवारी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खाजगी वाहनांचा अक्षरशः महापूर येत आहे. त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम अर्थात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांवर या वाहतूक कोंडीचा ताण पडत आहे.
शासनाच्या पाच दिवसांचा आठवडा या नूतन निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, हाॅटेल, रिसाॅर्ट आणि सर्व समुद्र किनारे शनिवार आणि रविवारी पर्यटकांच्या गर्दीने अक्षरशः फुललेले दिसून येत आहेत. यामुळे रायगड जिल्ह्यातील छोटे मोठे हाॅटेल आणि रिसाॅर्ट व्यवसाय सद्या आर्थिक तेजीत आलेले दिसून येत आहेत. तर दुसरीकडे सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्यालयातील साप्ताहिक कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा केल्यामुळे सर्व सामान्य गोरगरीब जनतेला आपल्या सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत अशी सर्व सामान्य जनतेची सर्वत्र तक्रार दिसून येत आहे.