ओबीसिंची जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तो पर्यंत माघार नाही" धसई , म्हसा येथील जनजागृती सभेत मुरबाड तालुक्यातील ओबीसींनी केला एल्गार!

जनदूत टिम    07-Dec-2020
Total Views |
मुरबाड :ओबीसी जनगणना झालीच पाहिजे व इतर अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ, वाडा, कर्जत, कल्याण तालुक्यासह महाराष्ट्रातील विविध तालुक्यात मोठया संख्येने ओबीसी बांधव आपल्या न्याय हक्कासाठी ओबीसी बांधवांनी ओबीसी जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत माघार नाही व आपले हक्क मिळवण्याचा विढा उचलला आहे.
 
janaganana_1  H
 
ओबीसी समाजाची २०२१ला ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे,अन्यथा पुढील येणारी जनगणना आम्ही करणार नाहीत असा इशारा राज्य शासनाला दिला असून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी जनगणना ही झालीच पाहिजे. ओबीसींची जनगणना ही जाणीव पूर्वक करत नसल्याचे समोर येत असल्याने ओबीसी जातनिहाय जनगणना होत नाही तो पर्यंत माघार नाही असा एल्गार करण्यात आला.मुरबाड तालुक्यातील विविध गावपाड्यांत ओबीसी जनजागृती मोहीम राबवून महत्व पटवून देण्यात येत आहे. आतापर्यंत ओबीसी जनजागृतीचे मुरबाड,शहापूर तालुक्यात तब्बल ७९ कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
 
ओबीसी संघर्ष समन्वय समिती यांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी आरक्षण जनजागृती सभेचे म्हसोबा देवस्थान हॉल, म्हसा व धसई येथे आयोजन केले होते. या वेळी युवा पप्रबोधनकार आणि सचिव-ओबीसी समिती रायगड रोशन पाटील यांनी ओबीसी आरक्षण या संदर्भात महत्व पटवून दिले या वेळी कुणबी समाज उन्नती मंडळ मुरबाड अध्यक्ष शांताराम बांगर, माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत घोलप,राजाराम घोलप, जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत,श्रीधर घोलप, भास्कर पवार,विठ्ठल डामसे,प्राध्यापक हरीचंद्र घोलप, सोमनाथ सुरोशे,पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ,सरचिटणीस पी. एस. पवार,माजी पंचायत समिती सदस्य परशराम भोईर,जिल्हापरिषद सदस्या रेखा कंटे,शिवसेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे,अप्पा घुडे,शिव व्याख्याती जयश्री धळपे,रामभाऊ दळवी, तालुका ओबीसी समन्वय समिती संघटक शिवश्री.उमेशजी पाटील सर,सुहास मोरे,विठ्ठल म्हाडसे,प्रकाश पवार,संतोष देसले, प्रकाश सुरोशे यांसह तालुक्यातील जनसमुदाय मोठया संख्येने उपस्थित होता.