कोरोना उपचारासाठी ‘सिद्धा’चे औषध प्रभावी

जनदूत टिम    04-Dec-2020
Total Views |
पुणे : कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे औषध निर्माण करण्यासाठी भारतातही अनेक वैद्यकीय संस्था संशोधन करत आहेत. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी पारंपरिक सिद्धा उपचार पद्धतीतील 'कबासूर कुडीनीर' हे औषध अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे फ्रँकफर्ट बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर (एफबीआयसी ), सेंटर कौन्सिल फॉर रिसर्च इन सिद्धा (सीसीआरएस) आणि श्री श्री तत्वा या संशोधन संस्थांनी म्हटलेलं आहे.

shree ravi shankar_1  
 
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी सोमवारी ( दि ३०) ऑनलाइन पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेला एफबीआयसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर क्रिश्चन गार्बे, आयुष्य डॉक्टर राजा एम, सीसीआरएसच्या महासंचालक डॉ के कनकवल्ली, श्री श्री तत्वाचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद वर्चस्वी
उपस्थित होते.
श्री श्री रविशंकर म्हणाले, प्रथमच पारंपारिक औषधाचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला असून संशोधन आणि औषधाच्या चाचण्यांमधून आयुर्वेदिक औषधांची आवश्यकता सिद्ध झाली आहे. सिद्धा उपचार पद्धतीबद्दल तामिळनाडूच्या बाहेरील नागरिकांना अधिक माहिती नाही. मात्र सिद्धावर आधारित हर्बल औषधांवर आता जर्मन संशोधक नवीन संशोधन करत आहेत.
रुग्णांवर सकारात्मक परिणाम-
कोरोना उपचारासाठी 'आर्युजिनोमिक' हा संशोधन प्रकल्प सुरू केला असून त्यामध्ये आयुर्वेदिक औषधांची रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रतिबंधात्मक कार्यप्रणाली तपासण्यात येत असल्याचे डॉ. गार्बे यांनी स्पष्ट केले.
पहिली चाचणी फ्रान्स येथील फ्रँकफर्ट बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटरमध्ये सिद्धाच्या 'कबासूर कुडीनीर' औषधाबाबत घेतली. तर दुसरी चाचणी बंगळुरू येथील नारायण विद्यालयांमध्ये घेण्यात आली. सौम्य लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना औषध दिल्यानंतर. २८ दिवसांमध्ये रुग्णावर कोणताही नकारात्मक परिणाम दिसला नसल्याचे आढळले.
शक्ती ड्रॉप, अमृत टॅब्लेट, टर्मरिक प्लस टॅब्लेट, तुलसी अर्क ड्रॉप या आयुर्वेदिक औषधांचेही परीक्षण करण्यात आले. बंगळुरू येथील मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सौम्य लक्षणे दिसणाऱ्या ४० कोरोना बधितांना आणि ९६ वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही औषधे देण्यात आली होती. संबंधित औषधामुळे रुग्णांचा फायदा झाल्याचा दावाही श्री श्री तत्व या संस्थेने
केला आहे.
'विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करावे लागणार' -
उपचाराच्या पद्धतीमध्ये अडकून न पडता त्याकडे विशाल दृष्टिकोनातून पाहायला हवे आयुर्वेदाला आता जगात स्वीकृती मिळत असून आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर आयुर्वेदाला स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे, अशा संशोधनातून आयुर्वेदिक यशस्वी होत आहे. अशी माहिती श्री श्री रविशंकर यांनी दिली.
प्राचीन उपचार पद्धती-
दक्षिण भारतात अनेक शतकापासून सिद्धा उपचार पद्धती रुग्णांना उपचार करण्यासाठी वापरण्यात येते. तामिळनाडूमध्ये अनेक डॉक्टर ही पद्धती वापरतात. पाच महिन्यापूर्वी तामिळनाडू सरकारने सिद्धा उपचार पद्धती कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे म्हटले होते.
सीसीआरएसच्या महासंचालक डॉ कनकवल्ली म्हणाले, तामिळनाडूमध्ये आम्ही 'कबासूर कुडीनीर' हे औषध वितरित केले होते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ते प्रभावी ठरल्याचे आढळून आले आहे.