न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय डोळखांब या विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांकडून ४ फॅनची देणगी

जनदूत टिम    04-Dec-2020
Total Views |
डोळखांब : न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय डोळखांब या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून ४ पंखे देऊन विद्यालयाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली . याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे विभागीय अधिकारी सन्मा. संजय मोहिते साहेब व इतर मान्यवर तसेच स्थानिक स्कुल कमिटीचे जेष्ठ सदस्य विकास भाई चौधरी, पर्यवेक्षक हरणे सर उपस्थित होते.

dolkhamb_1  H x 
 
विद्यालयाचे मुख्याध्यापक शेखर राजेघाटगे यांच्या उत्तम प्रशासनाचा आढावा घेत माजी विद्यार्थ्यांनी देणगी देण्याचा निर्णय घेतला असे माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. माजी विद्यार्थी देविदास सांबरे, हरेश कुलकर्णी, समाधान अधिकारी, विवेक चौधरी, जयेश मोरे, राजेश वरकुटे, महेंद्र सांबरे, हरीश तिवार,भरत धारवणे,प्रतिक बागराव, दिलीप पवार,प्रकाश फरडे, दिपक घरत, नितिन पवार, नीरज गवई, दिपक कुलकर्णी,अविनाश काळे, सुशील घरत, पराग चौधरी, रोहित चौधरी, विशाल साबळे, संतोष शेंडे,अशोक फर्डे ,मिलिंद दळवी यांनी विद्यालयाला देणगी देऊन सहकार्य केले त्याबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापकांनी आभार व्यक्त केले.