भाजपच्या वतीने कल्याणमध्ये भव्य रक्तदान 

जनदूत टिम    29-Dec-2020
Total Views |
कल्याण : सद्ध्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सरकारच्या वतीने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेले कित्येक महिने महाराष्ट्रातील जनता कोरोना सारख्या भयंकर महामारीशी लढा देत आहे. या लढाईत डॉक्टर रुग्णांना वाचविण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अशातच आता महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.

Kalyan448_1  H  
 
रक्ताची हि कमतरता भरून काढण्यासाठी सरकारच्या वतीने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले . यासाठी नागरिकांना रक्तदान करणे सोपे व्हावे . आणि जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण धोक्यात जाऊ नये यासाठी खासदार कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस केंबारे, साई गोईकणे, मेहेक लाड, राहुल देशमुख यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
 
आयोजित या रक्तदान शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कल्याण (प) बेतुरकर पाडा परिसरातील सुमारे १०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिराला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी आयोजक तेजस केंबारे यांच्या वतीने रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.