वाशिंद ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार

जनदूत टिम    29-Dec-2020
Total Views |

दुपारी कोणीही कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात नसल्याने नागरिकांचे हाल

वासिंद : बहुजन विकास आघाडी शहापूर तालुका कमिटी च्या वतीने वाशिंद ग्रामपंचायत हि भविष्यात नगरपंचायत व्हावी , ग्रामपंचायत मधील रिक्त सदस्य पदाची पोटनिवडणुकीत व्हावी , ग्रामपंचायत मधील समस्या व प्रश्न सोडवावेत या दृष्टीकोन निवेदन घेऊन त वाशिंद शहर कमिटी व तालुका पदाधिकारी ग्रामपंचायकार्यालयात दुपारी 1 च्या सुमारास हे निवेदन देण्यासाठी म्हणून गेले असताना त्या ग्रामपंचायत कार्यलायत कोणीही कर्मचारी हजर नव्हते. या उलट कार्यलयाला कुलूप लावुन सर्व कर्मचारी घरी निघुन गेले होते.
 
vasind0254_1  H
 
वाशिंद ग्रामपंचायत मधील ही दुरवस्था पाहून सदर ग्रामपंचायत कर्मचारी ना पंचायत समिती प्रशासनाने शिस्त लावली नाही तर आगामी काळात बहुजन विकास आघाडी आंदोलन करणार असल्याचा इशारा ब वि आ शहर अध्यक्ष गणेश काठोले यांनी दिला आहे. दरम्यान वशिंद ग्रामपंचायत मधील भोंगळ कारभार यामुळे दिसून आला असून नागरिकांचे होणारे हाल व लोकप्रतिनिधी चा नसणारा वचक दिसून आला आहे.