विकासासाठी नेहमी सहकार्याची भूमिका आवश्यक - ज्ञानदेव पोवार

नरेश पाटील    25-Dec-2020
Total Views |
माणगांव : प्र.क्र. १६ खांदाड येथे दी. २२ रोजी गावातील काही अंतर्गत रस्त्यावरचा नवीन रस्ता बनविण्यासाठी कामाला प्रत्यक्षरीत्या सुरुवात करण्यात आली होती. हे काम नगरपंचायत मार्फत होत आहे. तत्पूर्वी या कामाचे भूमिपूजन काही दिवसापूर्वी पालक मंत्री तथा राज्य मंत्री. कु. अदिती तटकरे यांनी केली होती, त्या समयी या वार्डच्या नगरसेविका तथा विद्यमान नगराध्यक्षा योगिता गणेश चव्हाण, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव आदी उपस्थित होते.
 
mangav254811_1  
 
नवीन रस्त्याचा काम हा छोटा रस्ता बनविण्यात येत असल्या बाबी लक्षात येताच राजीपचे माजी सभापती ज्ञानदेवजी पोवार यांनी न.पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन नवीन होत असलेल्या या छोट्या रस्त्याला आणखीण रुंदी वाढवून मोठा करावा म्हणून सूचना दिली. जनतेने जसे आम्हाला निवडून दिल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून अधिकार प्राप्त होतो तसेच तुम्ही शासन अधिकारी असल्याने तुम्हाला जे पॉवर्स आहेत ते वापरून आपण रस्ता रुंदी करण्याचा निर्णय घ्यावा. अखेर रस्ता रुंदीकरणला मान्यता देऊन मोठा रस्ता करण्याचा निर्णय झाला अशी माहिती दै. वादळवाराचे प्रतिनिधीस पोवार यानी माहिती दिली. नवीन रस्त्यासाठी खोदकाम चालू होताच काही ठिकाणी जमिनीखाली नळ जोडण्याची पाण्याची पाईप लाईन जेसीबी यंत्रणमुळे उपटून बाहेर पडली परिणामी गेल्या दोन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या उदभवली हि गोष्ट काही गरीब शेतकरी यानी ज्ञानदेवजी पोवार यांचाकडे हि बाब लक्षात आणून देताच खांदाड गावासाठी नेहमी धावून येणारे पोवार यानी तातडीने स्वखर्चातून अनेकांना पाईप उपलब्ध करून पाण्याची लाईन जोडून देण्याचा पुण्य काम करून मदत केले.
 
mangav2548_1  H
 
दरम्यान रस्ता रुंदीकरणच्या वेळी आणखीन काही समस्या उदभवले जसे काहीनी रस्ता रुंदीकरणासाठी आपली जागा सोडण्यास नकार दिला. हेही गोष्ट पोवार यांना समजतास त्यांनी त्या ठिकाणी जाऊन काहींना समजूत काडून मोलाचे सल्ले दिले जसे विकास कामासाठी प्रत्येकानि थोडा तरी त्रास आणि त्याग केल्याशिवाय विकास कसा साध्य होईल? असे सांगताच काही रहिवासिंनी समजूतदार पणाने रस्ता रुंदीकरणास तयारी दर्शवीत आपला कुंपण, पत्रे आणि पोल जागेतून हटवून रुंदीकरण करण्यास सहकार्य केले. तर ही जबरदस्त कामगिरी पोवार यांनी केल्याने नवीन रस्ता रुंदीकरणास जो कामात अडथळा होत होता अगर काम थांबण्याचा जो चिन्ह दिसत होता ते पोवार साहेबमुळे विकास कामास चालना मिळाली आणि हि बाब त्याक्षणी लक्षानिय निदर्शनास समोर आले.
 
पुढे पोवार यानी प्रतिनिधीला विचारले की तुम्ही काही दिवस पूर्वी पथेदिवेच्या बाबी आपण बातमी दिली होती तर त्या विषयी नेमका काय विषय होता? असा विचारतास त्यांच्या निदर्शनास हि गोष्ट लक्षात आणून दिली की नुकताच काही दिवसांपूर्वी निव्वळ एका घराला न.पं. च्या कर्मचाऱ्यांनी एकच घर असलेल्या घराला पथेदिवेची सोय करून देण्यात आले होते. मात्र नगरातील बहुतेंकहून वार्ड मध्ये मोक्याचे अंतर्गत असलेल्या अनेक रस्त्यांचे पथेदिवे गेल्या सहा महिन्याहुन अधीक काळ विना दुरुस्थ बंद असल्याने रात्रीचा वेळी स्थानिक रहिवासी यांना अनेक अडचण होत असे असा लक्षात आणून दिले. हे ऐकताच पोवार यानी तीव्र ना पसंद व्यक्त करून सत्तेवर बसलेल्या या सर्व सदस्य गेल्या पाच वर्षात माणगांवच्या विकासासाठी काहीही केले नाही म्हणून समस्त माणगांवकर यांना साथ दिले की या पुढिल निवडणुकीत अजिबात यांना निवडून देऊ नका. असे आव्हान या दरम्यान केले.
या वेळी जिल्हा आय. काँग्रेस उपाध्यक्ष ज्ञानदेवजी पोवार, नगराध्यक्ष योगिता चव्हाण,न.पंं.चे जुनियर इंजिनीयर अभिषेक जैन, नीरज (सिविल), आकाश बुवा (पाईप लाईन) सामाजिक कार्यकर्ते बाळा मांजरे, पोवार नथुराम, सुनिलदत्त चव्हाण, पालकर सीताराम, गुगले नथुराम,आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.