प्रस्थावीत डम्पिंग ग्राउंडने खातीवलीचा विकास? की आजी माजी लोकप्रतिनिधींचा ठेकेदारीसाठी प्रशासकीय षडयंत्र?

कैलास ढमणे    20-Dec-2020
Total Views |

१०० टक्के स्थानिकांचा विरोध असलेला हा प्रकल्प कोणाच्या हिताचा?

वासिंद : मुंबई नाशिक हायवेपासून हाकेच्या अंतरावर असलेले खातीवली गाव सध्या एका प्रस्थावीत प्रकल्पाच्या विरोधामुळे चर्चेत येत आहे.
अनेक वर्षे प्राथमिक सुविधांची उणीव असणारे खातीवली गाव सुरू असलेल्या डेव्हलपमेंटमुळे प्रगती पथावर येत असताना शासनाने डम्पिंग ग्राउंड प्रस्थावीत केल्यामुळे अडचणीत आले आहे, सदर डम्पिंग ग्राउंडमुळे गावचा विकास खुंटणार असून गाव १०० वर्षे मागे जाणार असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून येऊ लागल्या आहेत.
सदर डम्पिंग ग्राउंडसाठी खातीवली गावाच्या हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात माजी शिवसेना आमदार पांडुरंग बरोरा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र व्हायरल झाल्यामुळे गावात राजकीय वातावरण तापले असून, आरोप प्रत्यारोपांचा जंगी सामना रंगला असून उघड नाराजी सध्या ग्रामस्थांमध्ये दिसून येत आहे, गावातील ग्रामपंचयात बॉडी ही सेनेची असून ग्रामपंचायत ने या प्रकल्पाला १०० टक्के विरोध दर्शविला असून तसा ठराव घेऊन प्रशासनाला कळवून देखील प्रशासनाचा प्रकल्पाचा अट्टहासा मुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
नेमका प्रकल्प काय आणि त्याचे गावावर होणारे दुष्परिणाम
सदर कचरा डम्पिंग प्रकल्प हा खातीवली मधील शासकीय जागेवर प्रस्थावीत असून खातीवलीमधील अंदाजे सव्वा दोनशे एकर जागा यात बाधित होणार आहे, जिंदाल कंपनी, वासिंद शहर, शहापूर नगर पंचायत हद्द, आसनगाव, कळंबे, चेरपोली, खातीवली, बोरशेती येथील सर्व ओला सुखा कचरा या परिसरात डंप केला जाणार आहे.

परिणाम
- खातीवली गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.
- प्रकल्पातुन निर्माण होणारे रसायन पाण्यात मिसळून नदीत सोडले गेल्यामुळे नदीचे पाणी दूषित होणार.
- शेतकऱ्यांचा जमिनी नापीक होणार.
- परिसरात दुर्गंधी पसरेल.
- परिसरातील १५ हजार घरे बाधित होणार.
- भविष्यातील विकास प्रकल्पांना खीळ बसणार.
- पर्यावरण संतुलन बिघडणार.
 ग्रामस्थांचा या प्रकल्पाला १०० टक्के विरोध असताना हा प्रकल्प रेटला जात असल्यामुळे ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्र्यात असून प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलन छेडले जाईल असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
प्रस्थावीत प्रकल्पामुळे घनकचरा व्यवस्थापन कलम 2016 व पेसा ऍक्ट नुसार उल्लंघन
घनकचरा व्यवस्थापन कलम 2016 नुसार अशा प्रकारचे प्रकल्प मानवी वस्थी जवळ करता येत नाहीत तसेच खातीवली ग्राम पंचायत पेसा मध्ये येत असून ह्या कायद्यामध्ये कोणता ही प्रकल्प करत असताना ग्राम पंचायत चा ठराव महत्वाचा मानला जातो परंतु ग्राम पंचायत ने या प्रकल्प विरोधात ठराव सादर केला असून तो सादर केला आहे परंतु तरी ही शासन स्थरावरून जबरदस्ती केली जात असल्या मुळे नक्की प्रकल्प कोना साठी असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.
 
प्रकल्पाला विद्यामान आमदार दरोडांचा विरोध पण माजी आमदार बरोरांचा आग्रह
प्रस्थावीत प्रकल्प करण्या साठी खातीवली हद्दीत जागा उपलब्ध करून द्यावी अशी लेखी मागणी माजी आमदार बरोरा यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांना भेटून केल्या ग्रामस्थ संतापले असून त्यांनी या संदर्भात विद्यमान आमदार दरोडा यांची भेट घेऊन विरोध दर्शविला आमदार दरोडा यांनी लागलीच प्रकल्प रद्द करण्या संदर्भात मा जिल्हाधिकारी यांना पत्र दिले तरी प्रशासनाचा आग्रह कायम असून माझी आमदारांचे राजकीय वजन विद्यमान आमदार पेक्षा जास्त आहे का आशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
सदर प्रकल्प हा राजीकय ठेकेदारी साठी प्रेरित असून तो तात्काळ रद्द करून शहापूर तालुक्यातील इतर ठिकाणी आकारी पडीत ,वन विभागाची जमीन येथे प्रस्थावीत करावा तसेच जिंदाल कंपनी ने स्वतःचे कचरा व्यवस्थापन स्वतःचा मालकीचा 150 एकर जागे मध्ये करावे खातीवली ग्राम पंचायत स्वतःचे कचरा व्यवस्थापन करायला समर्थ असल्याची प्रतिक्रिया माजी उप सरपंच व विद्यमान सदस्य देविदास जाधव यांनी दैनिक जनदुत प्रतिनिधींशी बोलताना दिली तसेच लोकांनी या प्रकल्पाचे ठेके मिळवण्या साठी कोणाचे सेटिंग ,मनुष्य बळ, मशनरी कोणाचे याचा शोध घेण्याचे ही आव्हाहन त्यांनी ग्रामस्थांना केले आहे.
 
वाढत्या विरोधामुळे माजी आमदार बरोरा यांचा यु टर्न की राजकीय स्टंट
प्रकल्पाला वाढणार विरोध आणि लोकांचा उघड नाराजीमुळे माजी आमदार बरोरा यांनी ग्रामस्थांना शब्द दिला आहे की हा प्रकल्प होऊन देणार नाही त्यामुळे ते दिलेले शब्द पाळतील की राजकारण करतील यावर प्रकल्पाचे भविष्य काय या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.