खातिवली गावात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प होणार नाही......

जनदूत टिम    19-Dec-2020
Total Views |

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे आश्वासन

खातिवली : खातिवली गावांमध्ये घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प व खत निर्मिती प्रकल्प या विषयावर चर्चा करण्यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा ,शिवसेना तालुकाप्रमुख मारुती धिरडे यांनी गावकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नुकतीच होटेल धिंग्रा याठिकाणी छोट्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
 
barora_1  H x W
 
या सभेला ग्रामपंचायत कमिटी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेची प्रस्तावना करताना सचिन महाजन यांनी शिवसेना शाखेच्या वतीने आमदारांचे उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व शेवटच्या वाक्यात शिवसेनेचा व हे गावकऱ्याचाही या डम्पिंग ग्राउंडला विरोध आहे.असं स्पष्ट केले. त्यानंतर गावातील सुशिक्षित व गावाच्या प्रश्नांबाबत जाण असणारे  एकनाथ तारमळे सर यांनी हा प्रकल्प गावासाठी कसा घातकी आहे? याचे विवेचन केले.या प्रकल्पामुळे खातिवली गावाचे आरोग्य धोक्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वायुप्रदूषण पसरून खातिवलीतील रहीवासी तथा परिसरातील गावांना याचा त्रास होणार आहे. त्याचबरोबर यातून सोडले जाणारे जे रसायन आहे या रसायनामुळे पाणी प्रदूषित होऊन गावाच्या लोकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे दुर्गंधी पसरणार असून एक ते पाच किलोमीटर पर्यंत ही दुर्गंधी पसरणार.
 
खातिवली गावातील १५ हजार घरे बाधित होणार. या प्रकल्पात जे सर्वे नंबर घेतले आहेत. तेथील आदिवासी वस्ती उठणार. त्याचबरोबर परिसरात दुर्गंधी पसरून अनेक रोगांचे प्रमाण वाढणार आहे.त्यामुळे गावाचे आरोग्य धोक्यात येणार, अशा अनेक प्रश्नांबाबत सविस्तर विवेचन केले ज्या जिंदाल कंपनीने हा प्रकल्प राबवित आहे. त्या जिंदाल कंपनीकडे १५० एकर जागा असून त्या जागेत हा प्रकल्प राबविला जावा. अशी मागणी गावकऱ्यांनी केली. जिंदाल कंपनीतील कलर प्लँट हा वासिंद व परिसराला घातकी आहे. त्यामुळे वासिंदकरांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. कलर प्लँट मधील वेस्ट टाकायचा प्रश्न असल्याने जिंदाल फुकटात खातिवलीची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहे.अशा अनेक कारणांवर गावकऱ्यांनी चर्चा केली. हा प्रकल्प कसा चांगला आहे व असे प्रकल्प पाहण्यासाठी आमचे सोबत चला.
 
अशी भूमिका तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांनी मांडली. तर हा प्रकल्प वन विभागाच्या जागेमध्ये हे गाव वस्तीपासून दूरवर हलवण्यासाठी आमदार बरोरा यांनी पुढाकार घ्यावा असे वासिंदचे विठ्ठल भेरे यांनी सांगितले.तर धनेश जाधव यांनी हा प्रकल्प प्रदूषण त्याचबरोबर पर्यावरण किंवा टेक्निकली गावकऱ्यांच्या हिताचा नाही हे पटवून सांगितले. सर्वात शेवटी माजी आमदार बरोरा यांनी गावकऱ्यांचा १००% विरोध असल्यामुळे हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत खातिवली गाव येथे होणार नाही, असे गावकऱ्यांना आश्वासन दिले. त्याचबरोबर पर्यायी जागा या प्रकल्पासाठी शोधली जाईल असेही सांगितले. खातिवली गावाचे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर जाधव यांनी गावक-र्यां तर्फे निवेदन देऊन हा प्रकल्प रद्द करावा अशा पद्धतीची मागणी करून सर्वांचे आभार मानले. एकंदरीत हा प्रकल्प राबविण्यात विरोधक नमले हे मान्य करावे लागेल.