गांजा तस्करी करणाऱ्या त्रिकूटास अटक

जनदूत टिम    15-Dec-2020
Total Views |
कल्याण : कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या चाणाक्ष पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या तीन सराईत मनोव्यापाऱ गुन्हेगारांना जळगाव येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे या गांजा विक्रीच्या धंद्यात एका महिलेचाही सामावेसग असून तिलाही अटक करण्यात आली आहे.पोलिसांनुसार गांजा तस्करी ही मध्य प्रदेशातून कमी भावात घेऊन हा गांजा २५ पट अधिक भावाने विकत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
ganja_1  H x W:
 
कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांना माहिती मिळाली होती की, एक तरुण गांजा घेवून कल्याणमध्ये येत आहे. कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात पोलिसांनी सापळा लावला होता. गांजा घेवून आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. रोशन पाटील असे या तरुणाचे नाव आहे. तो जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून कल्याणला आला होता. त्याच्याकडून १.७५ किलो गांजा स्थानिक पोलिसांनी हस्तगत केला आहे. मात्र, रोशनने खुलासा केला तो धक्कादायक होता.
 
रोशन हा गांजा जळगावमध्ये राहणाऱ्या महिला गुन्हेगार उषा पाटील आणि अशोक कंजर यांच्याकडून घेत होता. सहाय्यक पोलीस निरिक्षक दीपक सरोदे यांच्या नेतृत्वात पोलिसांचे एक पथक जळगावला तपासासाठी गेले. जळगाव येथून गुन्हेगार अशोक कंजर आणि उषा पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले उषा पाटील या महिलेचा पती या व्यवसायात होता. त्याच्या मृत्यूनंतर उषा पाटीलने हा धंदा चालवला होता.अशोक कंजर हा सराईत गुन्हेगार असून, मनोव्यापार व गुंगीकारक औषधींद्रव्य बेकायदेशीर विक्री करणारा मोठा गांजा तस्कर आहे.
 
गुन्हेगार कंजर याला पोलिसांनी अमळनेर येथून २१ फेब्रुवारी २०१८ रोजी ११६ किलो ग्रॅम वजनाचा गांजाचा माल ५० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली होती.गुन्हेगार कंजर विरोधात अंमळनेर पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापरावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम २०,२२ सह . अक्ट क्रमांक.६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.अशी माहिती गुन्हे निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली आहे.
मध्यप्रदेशात हा गांजा ५०० त६०० रुपये किलो दराने विकत घेतला जातो. जळगावमध्ये हा गांजा ३ हजार रुपयांमध्ये विकला जातो. कल्याणात येईपर्यंत ही किंमत १३ हजार रुपये किलो होते. म्हणजे गांजाच्या व्यापारात किती बक्कळ फायदा आहे.या गांजा तस्करी करणाऱ्या गुन्ह्यात अटक झालेला गुन्हेगार रोशन पाटील इंजिरीईंग शिक्षण घेत असून, पैशाच्या लोभापाई या गैरधंद्यात सामील झाला आणि पोलिसांच्या हाती लागला.
 
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त- विवेक फणसाळकर ,सह पोलीस आयुक्त -सुरेश कुमार मेकला,अपर पोलीस आयुक्त- पूर्व प्रादेशिक विभाग-कल्याण ,दत्तात्रय कराळे,पोलीस उपायुक्त -परिमंडळ -३ विवेक पानसरे,सहाय्यक पोलीस आयुक्त-अनिल पोवार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर,गुन्हे पोलीस -संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलिसांनी ही अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना धडक कारवाईत अटक केली आहे.