एड. ब्रह्मा माळी आयोजित शासकीय शिबिर

जनदूत टिम    15-Dec-2020
Total Views |
डोंबिवली : देशाचे नेते अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त एड. ब्रह्मा माळी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये शासकीय योजनांची शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 
mali_1  H x W:
 
या कार्यक्रमास नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शासन कृत शिबिरामध्ये महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेंशन, जेष्ठ नागरिक कार्ड, पॅन कार्ड आदींचा समावेश होता. तीन दिवस झालेल्या शिबिरामध्ये नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला तसेच अजून काही दिवस शिबीर वाढवा याबाबत नागरिकांकडून मागणी करण्यात आली.
 
एवढी जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, सचिव सुरेय्या पटेल, विभाग अध्यक्ष शमीम शेख, महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, वॉर्ड अध्यक्ष योगेश डांगे, निखिल शहा, अजिंक्य माळी आदी पदाधिकाऱ्यांेची उपस्थिती दिसून आली. सोशल डिस्टंसिंग चे पालन करत शिबिराचे आयोजन करण्यात आले .