विटावा येथे महिला सक्षमीकरणासाठी अनुदान वाटप

जनदूत टिम    15-Dec-2020
Total Views |
ठाणे : महिला सक्षमीकरणासाठी विटावा येथील बौद्धजन रहिवाशी संघ आणि आधार इंडिया फाउंडेशन यांनी संयुक्त विद्यमाने सुमारे ६० महिलांना कुकींग प्रशिक्षण देऊन ६० हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले.
 
Thane52545_1  H
 
विटावा भागात विविध सामाजिक कार्यामध्ये आघाडीवर असलेल्या बौद्धजन रहिवाशी संघाने येथील महिलांच्या सक्षमीकरणाचे अभियान सुरु केले आहे. त्याच अनुषंगाने संघाच्या अध्यक्षा वर्षा साबळे व सचिव नवीन खैरे यांच्या पुढाकाराने आधार इंडिया महावेवस्थापक डॉ. अमित दुखंडे यांच्या मार्गदर्शनाने अर्चना शिंदे आणि अर्चना आघाम (खिल्लारे) यांच्या मदतीने महिलांसाठी कुकींग प्रशिक्षण अभियान राबविले होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये सुमारे ६० महिलांनी सहभाग नोंदविला होता.
 
स्थानिक नगरसेवक जितेंद्र पाटील (ठा.म.पा) यांनी या प्रशिक्षण शिबिरासाठी २०१९ मध्ये जागेची उलब्धता केली होती. वर्षभरापूर्वी हे शिबिर संपन्न झाले होते. सोमवारी येथील बुद्धविहारामध्ये संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात या साठ महिलांना प्रत्येकी एक हजार रुपये अनुदान आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आयुनी. सुनिता रणपिसे, आयुनी. विद्या अडसुळे, आयुनी. कृष्णा सोनवणे, आयु. आयु.भाऊराव अडसुळे, चंद्रकांत सावंत, एन.डी. सकपाळ यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.