एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द ! माकप आ. विनोद निकोले यांची विधानभवनात जोरदार घोषणाबाजी

जनदूत टिम    14-Dec-2020
Total Views |
डहाणू : महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या वाढवण बंदराच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द! अशा स्वरूपाचे बॅनर झळकवत निषेध व्यक्त केला आहे.

Dahanu_1  H x W 
 
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, बंदरासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा स्थापन केलेल्या कंपनीमार्फत विकसित केल्या जातील. त्यात समुद्रात भराव टाकून जमीन तयार करणे, बॅकवॉटरसाठी बांधकाम करणे, बंदरासाठी आवश्यक त्या दळणवळण सुविधा निर्माण करणे या कामांचा समावेश आहे.
 
त्यामुळे स्थानिक मच्छिमार वर्ग देशोधडीला लागणार आहे. या विरोधात १५ डिसेंबरला मुंबईच्या कफ परेड पासून डहाणूच्या झाई पर्यंतच्या कोळीवाड्यांनी बंदची हाक दिली असून या दिवशी किनारपट्टीवरील सर्व गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर होणार आहे त्यास आमच्या आघाडीचा तीव्र विरोध आहे. वाढवण बंदर रद्द झाले पाहिजे कारण, त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यातील अल्प भूधारक शेतकरी देशोधडीला लागणार आहे.
 
तिथे समुद्र किनारी राहणारा जो मच्छिमार आज वाढवण बंदर ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी समुद्रातील जैविक विविधता तिथे प्रजननासाठी अतिशय योग्य आहे. परंतु, वाढवण बंदर झाले तर हे संपूर्णतः नष्ट होणार आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या बंदराला प्रखर विरोध करत असून तो कायम राहणार आहे. दरम्यान विक्रमगड विधानसभा आमदार सुनील भूसारा, बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील, शेकाप आमदार जयंत पाटील उपस्थित होते.