माणगावमधील वातावरणात त्रिवेणी संगमचा अनोखी दृष्याचा अनुभव

नरेश पाटील    14-Dec-2020
Total Views |
माणगांव : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात एेन हिवाळ्यात अवकाळी पाऊस बरसले. हे वातावरण असेच दोन ते चार दिवस राहणार असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. परिणामी सर्व दूर चिखलमय पाहायला मिळत आहे.
 
mangaon145_1  H
 
माणगांव नगरीत सोमवार दी. १४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी सहा ते दुपारी १:३०च्या दरम्यान एकून चार निसर्गाचे ऋतू एकाच दिवसात अवघ्या सात तासात अनुभवयला मिळाले होते. सध्या एेन हिवाळ्याच्या मोसमात गारठा असल्याने सकाळी नेहमी प्रमाणे लोक झोपेतून उठल्यानंतर रिमझीम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का अनुभवायला मिळाले, मात्र सकाळी आठच्या नंतर अचानक वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यातच दोन तासानंतर सकाळी १० ते दुपारी बाराच्या दरम्यान संपूर्ण माणगाव नगरी दाट धुक्याच्या चादरीने झाकली गेली होती.रणे आणि कडक्याचे ऊन मुळे अंगातून झोरदार घाम सुटण्याचा प्रकार घडले.
 
mangaon58_1  H
 
जणू लोकांना समज झाले की आपण महाबळेश्वर सारखी वातावरणात आहोत. दुपारी १:३०च्या नंतर पाऊस, गारवा आणि दु:ख नाहीसे झाले आणि अचानक वातावरणात कडाक्याचे ऊन आणि उष्णता जाणवू लागली. त्यामुळे पहाटे, सकाळी आणि दुपारी वातावरणात घडलेल्या बदलाची चर्चा आणि हवामाणाच्या बाबी लोक ट्रोल करू लागले. बाजरात काहींनी तर प्रतिनिधीस आपली मत नोंदवली की बहुधा यापुढच्या वातावरणाची परिस्थिती पावसाळा आणि उन्हाळा हे दोनच ऋतू यापुढे असणार असे निदर्शनास आणून दिले.
 
दुसरीकडे आत्ता दिवाळी सण संपल्याने अनेक ठिकाणी लग्नाचे महुर्त सुरु असल्यामुळे महिलांची पापड बनविण्याचे लगभग असताना अचानक पाऊस, गारवा, सावली आणि दुखाचे वातावरण झाल्याने चांगली पंचायत झाल्याचे पाहावयास मिळालाले, मात्र दुपारी १:३०च्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान जाणवत होते कारण दुपारच्या नंतर कडाक्याचा ऊन पडला आणि पापड फटाफट बनवून बाहेर मिळेल त्या उन्हाच्या जागेत ठेवून सुकवून घेत होते. एकुणच माणगावात एकाच दिवसात काही कालावधीत थंडीची स्वेटर अंगावर घेणे, पावसामुळे छत्री वापरणे आणि कडक्याचे ऊन्हामुळे अंगातून जोरदार घाम सुटण्याचा प्रकार घडले.