मनसेसैनिक राहुल जयवंत पाटील आयोजित शासन कृत योजना शिबिर

जनदूत टिम    13-Dec-2020
Total Views |
डोंबिवली : आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासन कृत आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्ड शिबिर डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड नांदीवली येथे आयोजित करण्यात आले होते.

Dom MNS54_1  H  
 
आयुष्मान भारत जन आरोग्य योजना मध्ये दहा लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने मध्ये पाच लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत करून देण्याचा संकल्प आयोजक तथा मनसेसैनिक राहुल जयवंत पाटील यांनी केला आहे. कोरोना काळामध्ये नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सोशल डिस्टंसिंग चा वापर करीत योजना कार्डचे शिबिर आयोजित करण्यात आले. या योजनेचा गावातील सर्व नागरिकांनी लाभ घेतला.
 
आमच्या गावातील रुग्णांची पैशाअभावी हेळसांड होऊ नये . पैशाअभावी आमच्या गावकऱ्यांचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत अशी स्पष्टोक्ती राहुल पाटील यांनी केली.