पत्रकार नरेश पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने म.रा.म. पत्रकार संघ ठाणे जिल्हाच्या वतीने वाचनालयाचे उद्घाटन व कोरोना योद्धाना सन्मानित

जनदूत टिम    11-Dec-2020
Total Views |
भिवंडी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा सचिव तथा दैनिक लोकमत पेपरचे पत्रकार नरेश पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने दिनांक ११ डिसेंबर २०२० रोजी भिवंडी तालुक्यातील खांडपे येथे पत्रकार नरेश पाटील यांच्या राहत्या घरी सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाथ मोहिते, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सलग्न ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे , उद्योजक साईनाथ तारे, पडघा मंडळ अधिकारी किरण केदार , सामाजिक कार्यकर्ते हनुमान पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून खांडपे गावातील नागरिकांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने ठाणे जिल्हा यांच्या वतिने ज्ञानगंगा उपलब्ध करुन दिली.
 
Naresh Patil_1  
 
तर पत्रकार नरेश पाटील सह पत्नीक यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा यांच्या वतीने करण्यात आला. तसेच कोरोनाच्या पाश्वभूमीवर ज्यांनी आपले जीव धोक्यात घालून नागरीकांना अत्यावश्यक सेवा दिली. ते खांडपे गावातील कमळ चंद्रकांत पाटील,कल्पना संतोष पाटील, निलेश सुदाम तारे, हनुमान सुंदर पाटील यांना ''कोरोना योद्धा'' म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. तर नरेश हरी तारे,हनुमान सुदाम पाटील, ज्ञानेश्वर गुरुनाथ पाटील, मुकेश मधुकर पाटील, फशीबाई बाळाराम तारे,गणेश सोंग्या शेलार, यमुनाबाई अनंता पाटील यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.
आपल्या वाचनालया मध्ये अनेक पुस्तके अतिशय महत्त्वाची असून विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल व अनेक विद्यार्थ्यां मधून अधिकारी घडतील . आपला स्तुत्य उपक्रम असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हाचे कौतुक गटविकास अधिकारी डॉ.प्रदीप घोरपडे यांनी केले.
कोरोनाच्या काळात खांडपे गावातील नागरिक उत्तम काम आपली समाजिक जबाबदारी पार पाडत होते म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन व त्यांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी पत्रकार नरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा सचिव पत्रकार नरेश पाटील हे आपले कार्य प्रामाणिकपणे बजावत आहेत म्हणून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नरेश पाटील सपत्नीक यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे यांच्या वतिने करण्यात आला.
 
असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे अध्यक्ष भगवान चंदे यांनी बोलताना सांगितले.सदर कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष शंकर करडे ,भिवंडी तालुका अध्यक्ष मेघनाथ विशे ,कार्याध्यक्ष सुनील लोणे, तालुका सचिव मिलिंद जाधव , उपाध्यक्ष दीपक हिरे, शहापूर तालुका अध्यक्ष सुनील घरत, वसंत पानसरे, सचिन पोतदार ,पवार तर आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मिलिंद जाधव यांनी केले.