भाजपा वैशाली परदेशी आयोजित नेत्र तपासणी शिबिर

जनदूत टिम    11-Dec-2020
Total Views |
कल्याण: आजच्या धकााधकीच्या जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात.

Dombivali2546_1 &nbs 
 
मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टी कल्याण महिला मोर्चा सचिव वैशाली संदेश परदेशी यांच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सा व अल्पदरात चष्मे वाटप शिबिराचे आयोजन आधारवाडी येथे करण्यात आले होते.
 
या शिबिराअंतर्गत नेत्र तपासणीबरोबरच रुग्णांना चष्मे व आवश्यक त्या औषधांचे वाटप करण्यात आले, तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावयाची याबाबतचे मार्गदर्शनही करण्यात आले.माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिबिराच्या दरम्यान भेट देऊन शिबिराची पाहणी केली.यावेळी १०० हून जास्त नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. सोशल डिस्टंसिंग चे पालन करून शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात भाजपा पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.