दिप प्रज्वलन करुन ध्वजनिधी संकलन शुभारंभ

जनदूत टिम    10-Dec-2020
Total Views |

ध्वजनिधी ऑनलाईन जमा करावा - डॉ.किरण महाजन

पालघर : ज्या नागरिकांना कार्यालयात येऊन ध्वजनिधी जमा करता येत नसेल अशा नागरिकांनी ध्वजनिधी ऑनलाईन जमा करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ करण्यात आला त्यावेळी डॉ. महाजन बोलत होते.
 
palghar_1  H x
 
ध्वजनिधी ऑनलाईन जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी या सुविधाचा जास्तीत जास्त वापर करावा ध्वजनिधी दिन 2019 मध्ये पालघर जिह्यास रू. 18 लाख 48 हजार निधी संकलनाचे उद्दीष्ट दिलेले होते. त्यापैकी 91.28% इतके उद्दीष्ट साध्य केले आहे. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी माघाडे, वनसंरक्षक अधिकारी भिसे, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर प्रांजल जाधव, विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.
 
या वेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन म्हणाले ध्वजनिधीसाठी सर्व अधिकारी यांनी सढळ हाताने निधि संकलनात योगदान देऊन जिल्ह्याचे उद्दीष्ट पूर्ण करावे जागरूक नागरीक ध्वजनिधीसाठी मदत करतात आपण त्याच्या पर्यंत पोचले पाहिजे. ज्याच्या पर्यंत पोचणे शक्य नाही त्यांना ऑनलाईन ध्वजनिधीसाठी मार्गदर्शन करावे. माजी सैनिक व त्याचे पाल्य शासकीय कार्यालयात कामानिमित्त येतात तेव्हा त्यांना सहकार्य केले पाहिजे.शाळा ,कॉलेजच्या विद्यार्थांमध्ये देश भावना जागृत करुन जास्तीत जास्त तरुणांनी देश सेवा करण्यात प्रोत्साहीत केले पाहिजे. असे. डॉ. महाजन यांनी सांगितले.