'रायगड भूषण मानकारी डॉ. प्रो. ए.आर. उंद्रे यांचे देहांत.'

नरेश पाटील     10-Dec-2020
Total Views |
माणगाव : शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केलेले रायगडचे सुपुत्र डॉ.अब्दुल रहीम उंद्रे यांचा मृत्यू मंगळवार दी.07 डिसेंबर 2020 रोजी पहाटे 3:30 च्या दरम्यान मुंबई येते सैफी हॉस्पिटल मध्ये त्यांचे प्राणज्योत मावळली.  ते 83 वर्षाचे होते.

undre_1  H x W:
 
डॉ. ए.आर.उंद्रे हे रायगड जिल्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मूळचे बोर्लीपंचतंनचे रहिवाशी होते. त्यांचा जन्म 05 डिसेंबर 1937 चा असून त्यांचे उच्च शिक्षण मुबंई आणि इंग्लंड तसेच अमेरिका येथे केले. त्यांनी आपले शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात पूर्ण करून काही काळासाठी परदेशात नोकरी केली . मात्र आपल्या देशातील गरीब जनतेस सेवा देण्यासाठी ते आपल्या मायदेशी परतले आणि मुबंई येते अनेक नामांकित हॉस्पिटल मध्ये जसे जे.जे. हॉस्पिटल, लीलावती, जसलोक, सैफी येते उल्लेखनीय कामगिरी बजावली
कै. डॉ.उंद्रे यानी रायगड जिल्यात शिक्षण क्षेत्रातही क्रांती घडवत जबरदस्त कामगिरी केले. त्यांनी दुर्गम खेडोपाड्यात गरीब विदयार्थ्यांस उच्च दर्जाचे शिक्षण इंग्रजी माद्यमातुन मिळावे म्हणून राष्ट्रीय तसेच अंतराष्ट्रीयव दर्जाचे आय.सी.एस.सी.दहावी आणि आय.एस.सी. बारावी वर्गाचे बोर्ड पॅटर्न 2003 पासून सुरु केला. तत्पूर्वी डॉ. उंद्रे यांनी सण 1982 साली स्टेट बोर्ड इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली होती.
डॉ. उंद्रे यानी रॉयल एज्युकेशनल सोसायटी स्थापन करून जिल्हातील अनेक तालुक्यात पूर्व प्राथमिक ते माध्यमिक शाळा सुरु केल्या . आज रोजी एकूण 12 हुन अधिक शाखा कार्यरत आहेत . एकूण पाच हजाराहुन आधीक ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे.डॉ. ए.आर. उंद्रे एवढ्यावर न थांबता त्यांनी ग्रामीण भागातील कॉलेज शिक्षण पुढे सुरु राहावे म्हणून कनिष्ठ महाविद्यालय आणि खास मुलींसाठी वूमेन्स डिग्री कॉलेज स्थापन केले. आज या डिग्री कॉलेज मध्ये ग्रामीण भागातील सर्वस्तरीय समाजातील अनेक मुली शिकत आहेत .
देशातील काही निराधार तसेच आपत्कालीन संकटात सापडलेल्या अनेक विद्यार्थी वर्ग यांना आपले शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी बोर्ली येथे मुलामुलींसाठी वस्तीगृह सण 1993 साली स्थापन केले. काही वर्षापूर्वी निराधार महिला आणि वयोवृद्धांसाठी ते नाना नानी गृहही डॉ. उंद्रे यानी सुरु केले.ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य तंदुरुस्त राहावे म्हणूनही अनेक वेळा आरोग्य शिबीरांचे आयोजन केले होते.त्यांनी राज्यात विशेष करून कोंकण आणि मुबंई येते वित्तीय, सहकारी क्षेत्रात, राजकीय आणि अनेक संस्थेशी ते निगडित होते.
डॉ. उंद्रे यांचे सामाजिक, शिक्षण तसेच वैद्यकीय क्षेत्रात उत्तम सेवा बाजावल्याबद्दल त्यांना काही वर्षापूर्वी 'रायगड भूषण ' देऊन त्यांचा येथोचित सन्मान करण्यात आला होता. ते एक उत्तम शल्यचिकित्सक होते. या कामगिरी साठी त्यांना चार वेळा सुवर्ण पदकांनी गौरविण्यात आले. ते मुबंई येते नामांकित ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज येथे सर्जरी प्रोफेसर म्हणून 25 वर्ष सेवा केले. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी अनेक पुस्तकांचे प्रकाशन केले.
डॉ. उंद्रे यांची तब्येत अचानक काही दिवसापूर्वी बिघडल्याने त्यांना सैफी हॉस्पिटल येते भरती करण्यात आले होते. आरोग्य जास्त खालावत गेल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.मात्र त्यांची झुंज अपयशी होऊन त्यांची प्राणज्योत मावळली .डॉ. उंद्रे यांचे दुःखद निधनाचे बातमी धडकताच अनेकांना अश्रू अनावर झाले. त्यांचे दफन मूळ गावी म्हणजे बोर्ली पंचतंन येथे त्याच दिवस सायंकाळी करण्यात आला. या समयी मोठा जनसमुदाय अखेरचा निरोप देण्यासाठी जमला होता.
दरम्यान दिवंगत डॉ. उंद्रे यांचे पार्थिव देह मुंबईतून बोर्लीपंचतंन येते येताच रॉयल शिक्षण संस्थेची माजी उपाध्यक्ष मोहम्मद मेमन आणि नागांव जम्मातचे अध्यक्ष अब्दुल माजिद जोमारकार यांचे अमूल्य सहकार्य लाभले. संस्थेची अनेक मान्यवर बेगम हमीदा उंद्रे, मोसीन उंद्रे, मौसूद दर्जी, डॉ. फारूक रेहमान, सबीर उंद्रे, शफि्क अहमद, शकिरा अहमद,संस्थे संचालित वूमेन्स डिग्री कॉलेजच्या प्राचार्य अब्दुल धनसे,तसेच प्रो.डॉ.ए.आर. उंद्रे. आय.सी.एस.सी. शाळेची मुख्यद्यापक अरिफ आयुब अन्सारी सर, शाळेची सुपरवायसर शिक्षक एम.आय.खतीब आणि कार्यलयनचे ज्येष्ठ कर्मचारी कौसर सय्यद या सर्वांनी दुःख प्रकट केले.